मुंबई : तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर माहिती असणं आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात काही बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या 7 टक्के व्याजदरापासून गृहकर्ज देत आहेत. गृहकर्ज घेण्यापूर्वी कोणत्या बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर सर्वात कमी आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे.
सरकारी बँकांकडून 7 टक्के व्याज दरानं कर्ज
18 सप्टेंबर 2026 च्या आकडेवारीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा गृहकर्जाचा व्याजाचा सुरुवातीचा दर 7 टक्के आहे. बँक ऑफ इंडियाचा 7.10 टक्के, UCO बँक आणि Union Bank of India चा व्याज दर 7.15 टक्क्यांपासून सुरु होतो. बँक ऑफ बडोदाचा सुरुवातीचा व्याज दर 7.20 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाचा सुरुवातीचा व्याज दर 7.25 टक्के आहे. कॅनरा बँकेचा कर्जाच्या रकमेनुसार व्याज दर 7.15 टक्के ते 7.25 टक्क्यांदरम्यान आहे.
खासगी बँकांचा व्याज दर किती?
साऊथ इंडियन बँकेचा गृहकर्जाचा सुरुवातीचा व्याज दर 7.25 टक्के आहे. एचएसबीसी बँकेचा 7.45 टक्के, आयसीआयसीआय बँकेचा 7.55 टक्के, कोटक महिंद्रा बँकेचा 7.60 टक्के, एचडीएफसी बँकेचा 7.75 टक्के, Axis बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर 8 टक्क्यांपासून सुरु होतो. ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरनुसार व्याज दरात बदल होतात.
हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचा व्याज दर
हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये एलआयसी हाऊसिंग फायनान्सचा व्याज दर 7.15 टक्क्यांपासून सुरु होतो. बजाज हाऊसिंग फायनान्सचा व्याजदर 7.25 टक्के, आयसीआयसीआय होम फायनान्स 7.50 टक्के, गोदरेज हाऊसिंग फायनान्स 7.65 टक्के, पीएनबी हाऊसिंग फायनान्स 7.50 टक्के आहे.
लोन की राशि से भी बदल सकती है दर
बँकांनी गृहकर्जाचे व्याज दर निश्चित केलेत त्या दरानुसार ग्राहकांना कर्ज मिळेलचं असं नाही. क्रेडिट स्कोअर, उत्पन्न, नोकरी प्रोफाइल, लोन टू वॅल्यू रेशो आणि मालमत्तेची माहिती या आधारावर अंतिम व्याज दर निश्चित केले जातात. गृहकर्ज घेताना केवळ सुरुवातीचा व्याज दर, प्रोसेसिंग फी, इतर शुल्क आणि कर्ज कालावधी याचा विचार करावा.