EPFO चा डबल धमाका! 7 लाखांचा मोफत विमा 10.5 लाख होणार? मोठा निर्णय काय? – Marathi News | EPFO double bonanza EDLI Insurance Scheme Will the 7 lakh free insurance rise to 10 lakh What is the major decision


कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजनाImage Credit source: एजन्सी

ईपीएफओने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. कर्मचाऱ्यांसाठी मासिक वेतन मर्यादा 15,000 रुपयांहून 25,000 रुपये करण्यात आली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल. त्यांना पीएफ आणि पेन्शनचा लाभ मिळेल. हा निर्णय या 17 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. पण या निर्णयामुळे अजून एक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, EPFO कडून देण्यात येणारी मोफत विमा योजनेचा लाभ वाढण्याची शक्यता आहे. EDLI म्हणजे Employee Deposit Linked Insurance मध्ये विमा सुरक्षा रक्कम वाढवली जाऊ शकते. म्हणजे सामाजिक सुरक्षेसह विमा सुविधाही मिळणार आहे.

15000 हून 25000 रुपये मासिक वेतन मर्यादा वाढ

ईपीएफओने अनिवार्य सदस्यत्वासाठीची मासिक वेतनमर्यादा 15,000 रुपयांहून 25,000 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय झाला. निर्णयामुळे सुमारे 51 लाख अतिरिक्त कर्मचारी ईपीएफओच्या कक्षेत येतील. कर्मचार्‍यांसाठी सामाजिक सुरक्षेचा परीघ वाढला आहे. PF आणि पेन्शन (EPS) कपातीचा आणि मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता यासोबतच कर्मचाऱ्यांना EDLI अंतर्गत विम्याचे संरक्षणही मिळणार आहे. पण काही दाव्यानुसार, विमा सुरक्षा रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या EDLI अंतर्गत किती विमा संरक्षण?

ईपीएफओच्या कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजनेतंर्गत (Employee Deposit Linked Insurance) सदस्यांना जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. जर नवीन वेतन मर्यादेनुसार EDLI लागू झाली तर कर्मचाऱ्यांच्या 7 लाख विमा सुरक्षेत वाढ दिसू शकते. 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षण रक्कमेत वाढ होऊ शकते.

10 लाखांचे विमा संरक्षण?

माहितीनुसार, सध्या EPFO च्या पात्र सदस्यांना 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळत आहे. ही विमा रक्कम वाढून 10.5 लाख होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा नवीन बदल अंमलात आणल्यास कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त विमा सुरक्षा, विमा रक्कम मिळू शकते. कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजना 2026 (EDLI Scheme 2026) यावर्षी 29 जूनपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. त्यातंर्गत यापूर्वीचा 7 लाख रुपयांचा मोफत विमा लागू आहेच. पण कर्मचाऱ्यांचे सरासरी पीएफ बँलन्स 50,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर कुटुंबाला 50,000 रुपयांची निश्चित रक्कम देण्यात येईल. त्यानंतरच्या रक्कमेचा 40% टक्के भाग जोडल्या जाईल. नवीन तरतूदीनुसार, त्याचा लाभ किमान एक लाख रुपयांपर्यंत आहेत. ईपीएफ सदस्यांचा मृत्यू हा काम करताना झाला आणि पीएफ योगदान, कॉन्ट्रीब्युशन 6 महिन्यांच्या आत जमा झाले तर अशा मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांच्या विम्यावर दावा दाखल करता येतो.

EDLI योजनेचे महत्त्वाचे मुद्दे

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर वारसदारांना 7 लाखांपर्यंत विमा संरक्षण

12 महिने नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना 2.5 लाख रुपयांचा लाभ

EPFO सदस्याला EDLI योजनेत नोकरीत असेपर्यंतच फायदा

सेवेत नसताना वारसदारांना विमा योजनेत दावा दाखल करता येत नाही

विम्याची रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात थेट हस्तांतरीत करण्यात येते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *