Bank Holiday: बँका ‘या’ आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?


नवी दिल्ली : 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान देशातील विविध भागांमध्ये बँका काही दिवस बंद राहणार आहेत. मात्र, देशभर बँकांचं कामकाज वेगवेगळ्या दिवशी बंद असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार या आठवड्यात वेगवेगळ्या कारणानं बँकेच्या शाखा बंद राहतील. याशिवाय रविवारी देखील बँक बंद राहील.  

बँका किती दिवस बंद राहणार?

14 ते 20 सप्टेंबरदरम्यान बँका चार दिवस बंद राहू शकतात. मात्र, या सुट्ट्या शहर आणि राज्यानुसार वेगवेगळ्या असतील. याचाच  अर्थ तुमच्या शहरात बँका बंद असल्यास त्या दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या राज्यात सुरु असू शकतात. त्यामुळं बँकेत जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील बँकेची सुट्टी जाणून घ्या.  
  

14 सप्टेंबरला बँका बंद राहणार?

14 सप्टेंबरला सोमवारी गणेश चतुर्थी निमित्त बँका विविध ठिकाणी स्थानिक सणाच्या निमित्तानं बंद राहतील. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. 
 

15 सप्टेंबर 

15 सप्टेंबरला जैन  समुदायाचं पर्व संवत्सरी असून ओडिशाचा कृषी उत्सव नुआखाई देखील आहे. हा गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आहे. या कारणामुळं बँकांच्या शाखा बंद असतील. तुम्हाला बँकेत एखाद्या कामानिमित्त जायचं असल्यास तुमच्या शहरात बँका बंद आहेत की नाहीत हे तपासलं पाहिजे.  

16 सप्टेंबर  

16  सप्टेंबरला गोव्यात स्थानिक सुट्टी असल्यानं बँका बंद असतील. बँकिंग सेंटरनुसार सुट्टी निश्चित केली जाते. यामुळं SBI, HDFC Bank, ICICI Bank, PNB आणि दुसऱ्या बँका देखील इतर शहरांमध्ये बँका आरबीआयच्या कॅलेंडर नुसार शाखा बंद ठेवतात. 

20 सप्टेंबर

20 सप्टेंबरला रविवारी देशभरात बँका बंद असतील. रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्व बँका बंद असतात. 19 सप्टेंबरला तिसरा शनिवार असल्यानं बँका सुरु राहतील. 

बँका बंद असल्यास काम कसं होणार?

बँकेच्या शाखा बंद असल्या तरी ऑनलाईन बँकिंग, यूपीआय, नेट बँकिंग यासारख्या पर्यायाद्वारे आर्थिक काम पूर्ण करता येऊ शकतात.  बँक खात्यातून पैसे काढायचे असल्यास एटीएम सेंटरमधून डेबिट कार्डद्वारे पैसे काढता येतात याशिवाय यूपीआय, नेट बँकिंग यासारख्य  डिजीटल सेवांचा वापर करता येऊ शकतो.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *