Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

Top 10 films highest Opening Day collection:  भारतात पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या सिनेमांच्या यादीत पहिलं नाव सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचे आहे. 2024 मध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 32 हजार 140 शोमधून 164.25 कोटीची नेट कमाई केली होती. भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण ग्रॉस कलेक्शन 209 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले होते. परदेशातलं ओपनिंग डे कलेक्शन  66 कोटी रुपये होतं. जगभरात या चित्रपटाने 275 कोटी रुपये ओपनिंग डेला कमावले. 

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

सर्वाधिक ओपनिंग डे कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसरे नाव रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या RRRचे आहे. 2022 मध्ये सगळ्या भाषांमध्ये ओपनिंग डे ला या चित्रपटाने भारतात 133 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. पहिलाच दिवशी या चित्रपटाचा वर्ल्डवाइड कनेक्शन 223 कोटी झालेलं. यात पहिल्या दिवसाचं ओव्हरसीज कलेक्शन 67 कोटी आणि भारतातलं ग्रॉस कलेक्शन 156 कोटी रुपये होतं.

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

तिसऱ्या नंबरवर प्रभासचा ‘बाहुबली 2 द कन्क्लूजन’ हा चित्रपट आहे. प्रभासची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झालेला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 121 कोटी रुपयांचं नेट कनेक्शन केलं होतं.ग्रॉस कलेक्शनचा आकडा 153 कोटी एवढा होता.या चित्रपटाने वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन 217 कोटी रुपये केलं. परदेशात 65 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई या चित्रपटाने केली होती.

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

चौथ्या क्रमांकावर ‘KGF चाप्टर 2’ चा नंबर लागतो. या चित्रपटाने 2022 मध्ये पहिला दिवशी भारतात 116 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं होतं. 134 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली होती. पहिला दिवशी वर्ल्ड वाईड कलेक्शनचा आकडा 159 कोटी रुपये होता.या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 24.50 कोटी रुपये केलं. 

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

टॉप 10 लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर बॉलीवूडची एक मात्र फिल्म ‘धुरंधर 2 द रिव्हेंज’ या चित्रपटाचे नाव घ्यावं लागेल. 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 102.55 कोटी रुपयांची नेट कमाई केली. भारतात या चित्रपटाचा ग्रॉस कलेक्शन 174.60 कोटी रुपये होतं.परदेशात पहिला दिवशी या चित्रपटाने 52 कोटींचा आकडा गाठला. ओपनिंग डे ला धुरंधर 2 ने वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन 226.60 कोटी रुपये केलं.

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

सहाव्या क्रमांकावर सुपरस्टार यशची टॉक्सिक ही फिल्म आहे. या चित्रपटाने पहिलाच दिवशी 24579 शोजमधून देशभरात 101.10 कोटी रुपयांची नेट कमाई केली. 120.75 कोटींची ग्रोस कमाई केली. परदेशात या चित्रपटाचे ओपनिंग डे 20 कोटी रुपयांवर होतं. या चित्रपटाने ओपनिंग डेला केलेलं वर्ल्डवाईड कलेक्शन 140 कोटी रुपये होतं.

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

सातव्या क्रमांकावर प्रभास प्रमुख भूमिकेत असलेला कलकी 2898 AD हा चित्रपट आहे. 2024 मध्ये आलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने ओपनिंग डे ला 95 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. 114 कोटी रुपयांचा ग्रास कलेक्शन करत परदेशात 63.70 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले होते. या चित्रपटाचे वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन 177.72 कोटी झालेलं.

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

या लिस्टमध्ये आठव्या नंबर वर प्रभासची प्रमुख भूमिका असलेला ‘सालार पार्ट वन सिझफायर’ हा चित्रपट येतो. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 90.70 कोटी रुपयांची नेट कमाई केलेली. 107.12 कोटी रुपये ग्रॉस या चित्रपटाने कमावले होते.या चित्रपटाचे वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन 158.12 कोटी रुपयांवर थांबलेलं. परदेशामध्ये 51 कोटींची ग्रॉस कमाई या चित्रपटाने केली होती.

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

नवव्या क्रमांकावर प्रभासची चौथी फिल्म आदिपुरुष येते. हा सिनेमा फ्लॉप झाला असला तरी ओपनिंग डे ला 2023 मध्ये या चित्रपटाने भारतात 86.75 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. 103.8 कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन या चित्रपटाने केलेलं. परदेशात 25 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई करत वर्ल्ड वाईड कलेक्शन 128.08 कोटी रुपयांवर होतं . 

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

दहाव्या क्रमांकावर जुनियर एनटीआरची ‘देवरा पार्ट 1’  या चित्रपटाचं नाव घ्यावं लागेल. कारण या चित्रपटाने 2024 मध्ये ओपनिंग डेला देशभरात ८२.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. 98.2 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केलेली. बॉक्स ऑफिसवर नंतर ही फिल्म फ्लॉप ठरली मात्र पहिल्या दिवशी जगभरात या चित्रपटाने 142.2 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं होतं.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *