पाकिस्तानच्या बाबरसेनेला शुबमन गिल एकटाच बस्स…! टॉप पाच फलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रम – Marathi News | Shubman Gill scored more runs during the England tour than Pakistan did across five Test innings


पाकिस्तानच्या बाबरसेनेला शुबमन गिल एकटाच बस्स…! टॉप पाच फलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रमImage Credit source: pti/icc twitter

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला क्लिन स्विप मिळणार हे जवळपास नक्की झालं आहे. कारण तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान पराभवाचा वेशीवर आहे. कारण पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ 133 धावांवर सर्व बाद झाला. त्यामुळे इंग्लंडकडे 320 धावांची आघाडी आहे. फॉलोऑनमध्ये या धावा गाठणं पाकिस्तानला कठीण जाणार आहे. पण पहिला डाव संपला आणि एक विचित्र आकडा समोर आहे. पाकिस्तानने इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत 5 डावात एकूण 743 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुबमन गिलने इंग्लंड दौऱ्यात 754 धावा एकट्याने केल्या होत्या. त्यामुळे पाच डावातील सरासरी पाहिली तर शुबमन गिल वरचढ ठरला आहे. शुबमन गिलने मागच्या वर्षी पाच कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. शुबमन गिलने 4 शतक ठोकले आणि 75.40 सरासरीने धावा केल्या.

पाकिस्तानने पाच डावात एकदाही 200 आकडा गाठला नाही

पाकिस्तानची इंग्लंड दौऱ्यात पुरती नाचक्की झाली आहे. दुसरा कसोटी सामना गमावताच निम्म्याहून अधिक संघ बदलला. त्यामुळे काही बदल होईल असं वाटलं होतं. पण येथेही तसंच झालं. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ 133 धावांवर सर्वबाद झाला. आतापर्यंत खेळलेल्या पाच डावात एकदाही 200 धावांचा आकडा गाठता आलेला नाही. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 171 आणि दुसऱ्या डावात 135 धावा केल्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 110 आणि दुसऱ्या डावात 194 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 133 धावांवर पाकिस्तानचा संघ गारद झाला. पाकिस्तानही एकही फलंदाज शतक ठोकू शकला नाही. यात फक्त दोन अर्धशतकं आली.

तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तानचे टॉप 5 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं. पाकिस्तानच्या टॉप 5 फलंदाजांच्या नावावर एकेरी आकडा होता. सऊद शकील काही काळ तग धरून होता आणि 43 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाजी मोठी खेळी करू शकला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *