Asha Bhosle Last Song Released: आशा भोसले यांचं शेवटचं गाणं रिलीज; गातानाचा शेवटचा Video पाहून चाहते गलबलून गेले…


Asha Bhosle Last Song Released: भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचं 12 एप्रिल 2026 रोजी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी आशा भोसलेंनी अखेरचा श्वास घेतला अन्  भारतीय संगीत विश्वाला, असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला. आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी गायलेलं शेवटचं गाणं आज रिलीज करण्यात आलं. या गाण्याचा एक खास व्हिडिओ समोर आलाय. यात आशाताईंना शेवटचं गाताना पाहून चाहत्यांना गलबलून येत आहे. आशा भोसले यांची संगीत विश्वातील पोकळी न भरून निघणारी आहे.

आशा भोसलेंच शेवटचं गाणं रिलीज

आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त ‘ओम का हरी’ या चित्रपटाचा निर्मात्यांनी आशाताईंचं शेवटचं गाणं रिलीज केलं आहे. ‘ए मेरी जिंदगी’ असं या गाण्याचं नाव असून याच नावाने असलेल्या युट्युब व्हिडिओमध्ये आशा भोसले स्टुडिओमध्ये हे गाणं रेकॉर्ड करतानाची दृश्य टिपण्यात आली आहेत.यात चित्रपटाचे निर्माते अभिनेते अंशुमनझा यांच्याशी त्या संवाद साधताना दिसत आहेत. बापलेकाच्या नात्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हरीश व्यास यांनी केलं असून अंशुमन झा आणि रघुवीर यादव प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट 18 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. ‘ए मेरी जिंदगी तू छुपी, है कहा’ हे गाणं 2023 साली रेकॉर्ड करण्यात आले होते.तेव्हा आशा भोसले यांचे वय 90 वर्षांपेक्षाही अधिक होतं.

‘ओम का हरि’ या चित्रपटाचं दिग्दर्शन हरीश व्यास यांनी केले आहे. वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारीत या ड्रामा कॉमेडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आशा भोसले यांचे शेवटचे गाणे प्रदर्शित करताना, सिनेमाचे दिग्दर्शक हरीश व्यास म्हणाले की, ‘आशाजींच्या वाढदिवसानिमित्त हे गाणं प्रदर्शित करणं ही त्यांच्या सुमधुर आवाजाला, आणि कोट्यवधि फॅन्सप्रति एक सन्मान आहे’, असं ‘ओम का हरि’ या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणाले. 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *