Horoscope Today 7 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 7 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील शेवटचा श्रावणी सोमवार आहे. हा दिवस भगवान भगवान शंकराला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शिवकृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात स्वतंत्र वृत्ती राहील, आत्मविश्वासाने स्वकर्तृत्वावर पुढे याल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणाची मदत घ्यायला आवडणार नाही, घरामध्ये स्वतःच्या बुद्धीने तर्काने काही कामे करून दाखवाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवहारात थोडी तारतम्य बुद्धी आणि सारासार विचार वापरला तर कामात यश मिळेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या दृढ निश्चयामुळे मी मी म्हणणारे तुमच्यापुढे नांगी टाकतील, या सर्व कामांमध्ये थोडी मानसिक आंदोलने अनुभवास येतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला स्वतःचा छंद जोपासतील, अनेक प्रतिष्ठित लोकांच्या सहवासात याल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल, घरातील सर्वांनाच घर सजवण्यामध्ये आनंद वाटेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील, स्थावर इस्टेटची कामे मार्गी लागतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्यांना घर घ्यायचे असेल, त्यांनी विचार करायला हरकत नाही प्रकृतीला मात्र जपावे
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जुने मित्र मैत्रिणी भेटतील, दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर राहाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रसिद्धी मिळेल, लेखकांच्या लेखन शैलीमध्ये एक वेगळाच अविष्कार दिसेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला आपल्या प्रेमळ वागणुकीने सर्वांना जिंकून घेतील, तुमच्या अंगी असलेल्या कलेचा अविष्कार इतरांना बघायला मिळेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटेल, अति भावनाप्रधानता टाळायला हवी.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! मालव्य – बुधादित्य राजयोगाची डबल पॉवर, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)