Sunil Pal On Samay Raina: ‘घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत…’ समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत


Sunil Pal on Samay Raina honoured by CM Devendra Fadanvis: ‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोवर झालेली टीका, कॉमेडियन समय रैनावर दाखल झालेले गुन्हे, कोर्टाचे आदेश या सगळ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या हस्ते समय रैनाचा (Samay Raina) सन्मान झाला. या समारंभाची एकच चर्चा झाली. दरम्यान अभिनेता सुनील पालने पुन्हा एकदा समय रैनावर सोशल मीडियावर टीका केलीय. सरकारने समय रैनाचा सन्मान का केला? असा सवाल करत सुनील पालने  “घोर कलयुग आ गया है, घोर कलयुग,” म्हणत या सन्मानामुळे तरुण कॉमेडियनमध्ये नेमका कोणता संदेश जाईल, अशी टीकाही केली आहे.

बुधवारी महाराष्ट्र सायबरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘महाराष्ट्र सायबर ॲन्थममधील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने अनेक सेलिब्रिटींचा गौरव केला. यात समय रैनाचाही समावेश होता. दरम्यान, अभिनेता सुनील पालने समय रैनाच्या सन्मानावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. त्याच्या प्रतिक्रियेची सध्या मनोरंजन वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नेमकं काय म्हणाला सुनील पाल?

सुनील पाल म्हणाला ‘ मित्रांनो आज मी शूटिंग करत आहे. आणि मला अशी बातमी मिळाली, महाराष्ट्र सरकारने समय रैनाला सन्मानित केलं. घोर कलियुग आलं, घोर कलियुग. तुम्ही कुठल्या गोष्टीमुळे त्याचा सन्मान करताय, हे तरी सांगा.. तो शिवीगाळ करतो. लेटंटसारखा शो आणतो, ज्यात सहभागी होणारे ही शिव्या देतात. पॅनलही शिवीगाळ करतं. अशा शिव्या दिल्या जातात,ज्या तुम्हाला ऐकवणारही नाही. अशा माणसाचा तुम्ही सन्मान केला. आता कॉमेडीमध्ये येणारे नवे कलाकार, तरुण यांच्यापर्यंत काय संदेश पोहोचणार?  सन्मान हवा असेल तर आधी कॉमेडियन बना, शिवीगाळ करा, पोलीस केस करून घ्या, तुमच्या भोवती असा वाद निर्माण करा की तुम्हाला मारत मारत पोलीस स्टेशनमध्ये नेलं जाईल; न्यूजमध्ये या मग तुमचा शो एकदम हिट शो म्हणून बाहेर येईल. जेव्हा तुम्हाला यश मिळेल, तेव्हा तुम्हाला सगळेजण सलाम करतील. जे पोलीस तुम्हाला मारत होते ते तुमची सुरक्षा करतील. जे सरकार तुमच्या विरोधात होतं ते तुमचा सन्मान करेल.’ असं सुनील पाल म्हणाला. पुढे ‘ घोर कलियुग ..घोर कलियुग.. हे देवेंद्र, हे नरेंद्र काय होत आहे, इंदिराजी सगळं पहात आहेत ‘ असं तो म्हणाला.

 

 

समय रैनाचा सन्मान का करण्यात आला?

समय रैना महाराष्ट्र सायबर अवेअरनेस शॉर्ट फिल्म आणि नव्या हेल्पलाइन अँथमच्या लॉन्च कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमातील व्हिडिओमध्ये समय रैना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत हसत-खेळत संवाद साधताना दिसला. तसेच आपल्या भाषणात त्याने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाचाही उल्लेख केला. त्यानंतर या कार्यक्रमातील व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

समय रैनाने महाराष्ट्र सायबरसोबतच्या आपल्या कनेक्शनवर भाष्य करत एक छोटा मजेशीर व्हिडिओही पोस्ट केला होता. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाच्या काळात याच नंबरवरून आपल्याशी अनेकदा संपर्क करण्यात आला होता, म्हणून आपण तो कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवला होता, असं म्हणत त्याने मजेशीर अंदाजात सांगितलं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *