Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy Update : बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-2 येथे दुलीप ट्रॉफी 2026 च्या पहिल्या क्वार्टर फायनलला सुरुवात झाली आहे. ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यातील या सामन्यात नॉर्थ ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ईस्ट झोनच्या डावाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी अवघ्या 8 धावांवर बाद झाला. नॉर्थ ईस्ट झोनचा कर्णधार रोंगसेन जोनाथनने नाणेफेक जिंकत ईस्ट झोनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ईस्ट झोनच्या डावाची सुरुवात अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशी यांनी केली. वैभवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याचा डाव फार काळ टिकला नाही.
वैभव सूर्यवंशी 8 धावांवर तंबूत (Vaibhav Sooryavanshi OUT for 8 off 6 balls)
नॉर्थ ईस्ट झोनचा वेगवान गोलंदाज बिश्वरजित कोंथौजमने डावाच्या दुसऱ्याच षटकात ईस्ट झोनला मोठा धक्का दिला. त्याने वैभव सूर्यवंशीला आपल्या गोलंदाजीवर बाद केले. वैभवने 6 चेंडूंचा सामना करत 2 चौकारांच्या मदतीने 8 धावा केल्या. कोंथौजमच्या चेंडूवर वैभवने फटका मारण्याचा प्रयत्न केला; मात्र जोसेफ लालथनखुमाच्या हाती त्याचा झेल गेला. त्यामुळे ईस्ट झोनला 12 धावांवर पहिला धक्का बसला. वैभव सूर्यवंशीच्या विकेटनंतर अभिमन्यू ईश्वरनची साथ देण्यासाठी कुमार कुशाग्र मैदानात आला. मात्र, सुरुवातीच्या काही षटकांमध्ये ईस्ट झोनच्या फलंदाजांना नॉर्थ ईस्ट झोनच्या गोलंदाजांनी चांगलेच अडचणीत टाकले.
4 षटकांनंतर ईस्ट झोन 20/1
सामन्याच्या सुरुवातीच्या 4 षटकांनंतर ईस्ट झोनची धावसंख्या 1 बाद 20 अशी होती. अभिमन्यू ईश्वरन 13 चेंडूंमध्ये 11 धावा करून खेळत होता. त्याच्या खात्यात 2 चौकार आहेत. दुसऱ्या बाजूला कुमार कुशाग्र 5 चेंडूंमध्ये 1 धावेवर नाबाद होता. नॉर्थ ईस्ट झोनकडून बिश्वरजित कोंथौजमने 2 षटकांत 13 धावा देत 1 विकेट घेतली आहे. आकाश चौधरीने 2 षटकांत 7 धावा दिल्या आहेत.
नॉर्थ ईस्ट झोन (प्लेइंग इलेव्हन) : रोंगसेन जोनाथन (कर्णधार), किशन लिंगडोह, आशिष थापा, अर्पित सुभाष भटेवरा, कंगाबम प्रियोजित सिंग, जोसेफ लालथनखुमा, फेरोइजाम जोतीन, आकाश चौधरी, इमलीवती लेमतूर, बिश्वरजित कोंथौजम, तेचि नेरी
ईस्ट झोन (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (w/c), वैभव सूर्यवंशी, अभिमन्यू ईश्वरन, कुमार कुशाग्र, सुदीप कुमार घरी, विराट सिंग, अनुकुल रॉय, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, अभिजित के सरकार
हे ही वाचा –