तुमचे चेकबुक बदला, जुने चेकबुक रद्द होणार ? आरबीआयने बदलला नियम – Marathi News | Alphanumeric code mandatory on chequebooks from January 1, 2027 rbi bank new rule


बँकींग प्रक्रिया वेगवान होण्यासाठी येत्या १ जानेवारी २०२७ पासून चेकबुकवर अल्फा न्युमरिक कोड बंधनकारक करण्यात आला आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना चेकबुक बदलण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अनेक बँकांनी नवीन चेकबुक जारी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर उर्वरित प्रक्रीया सुरु करण्यात येत आहे.

लवकर बदला तुमचे चेकबुक

नवीन बँक नियमांनुसार बँक ऑफ इंडियाने तिच्या ग्राहकांना सूचित केले आहे की ३१ डिसेंबर २०२६ नंतर ५० हजार आणि त्याहून अधिक रक्कमेचे जुने चेक ज्यावर नवीन अल्फा न्युमरिक कोड नसतील ते स्वीकारले जाणार नाहीत.
बँकेने ग्राहकांना नवीन चेकबुकसाठी लवकरच अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे पमेंट करताना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाहीत. याच प्रकारे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अन्य बँकांना देखील अल्फा न्युमरिक कोड असणारे चेकबुक जारी करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. बँक ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे नवीन चेकबुक घेण्याचा सल्ला दिला आहे.

प्रत्येक बँकेत शुल्क वेगवेगळे

नवीन चेकबुक वर शुल्क बँक आणि खात्याचा प्रकाराच्या हिशेबाने वेगलेगळे असू शकते. उदा. बँक ऑफ इंडियातील बचत खात्यासाठी २५ पानांचे एक चेकबुक वर्षाला मोफत आहे. त्यानंतरच्या प्रत्येक चेकच्या पानांसाठी पाच रुपये शुल्क आकारण्यात येते. उर्वरित बँकात शुल्क निरनिराळे अशू शकते.

चेक वटण्याचा वेळ कमी होणार

चेक क्लेअरिंगची व्यवस्थेला अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. आता चेक ट्रंकेशन आणि सततच्या क्लिअरिंगद्वारे पेपर चेक पेमेंट करणाऱ्या शाखेत पाठवण्याच्या प्रकरणात घट झाली आहे. यामुळे चेक क्लिअरिंगच्या वेळेत कपात झाली आहे. ट्रंकेशन चेक क्लिअरिंग सिस्टीमचे एक नवे रुप आहे. हा फिजिकली पेपर चेकला इलेक्ट्रॉनिक रुपात डिजिटाईज करते. ही प्रक्रिया चेकवर उल्लेखित रक्कमेचे पेमेंट करणाऱ्या बँकेला डिजिटल चेक पाठवण्यासाठी वापरली जाते. या व्यवस्थेने चेक वटण्यासाठी लागणाऱ्या वेळेत कपात झाली आहे.

असे आहे अल्फा-न्यूमरिक कोड

● अल्फा-न्यूमरिक कोडमध्ये अक्षर आणि अंक दोन्हींचा वापर होतो. यामुळे चेकची ओळख आणि सत्यापन सुरक्षित होते.

● चेकमध्ये छेडछाड किंवा बोगस चेकद्वारे पेमेंटचा धोका कमी होतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *