Jyoti Waghmare : सुप्रियाताई तुमचं कर्तृत्व काय? आपला पक्ष सांभाळता… ज्योती वाघमारे कडाडल्या – Marathi News | Shiv Sena MP Jyoti Waghmare attack on Sharad Pawar NCP leader Supriya Sule after Uddhav Sena Shinde Sena Dispute


सुप्रिया सुळे, ज्योती वाघमारे Image Credit source: टीव्ही ९ मराठी

शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जे वक्तव्य केले, त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. शिवसेना ही ठाकरेंची आहे. शिवसेना त्यांचीच होती. आजही आहे आणि उद्याही राहील, असे मोठे वक्तवय् सुप्रिया सुळे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उसळल्या नाही तर नवलच? खासदार ज्योती वाघमारे यांनी एकहाती शिंदे सेनेचा किल्ला लढवला. त्यांनी सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आपला पक्ष सांभाळता येत नाही आणि लोकांना तुम्ही शहाणपणा शिकवता? असा पलटवार वाघमारे यांनी केला.

तुमचं स्वतःच काय कर्तृत्व आहे?

सुप्रिया ताई या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या आहेत. खासदारकी, आमदारकी आणि पदं तुम्हाला आयती मिळाली आहेत. तुमचं स्वतःच काय कर्तृत्व आहे? असा सवाल वाघमारेंनी केला. लोकांना जनमताआधारे शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली. ती त्यांच्याकडे सुरक्षित आहे. सुप्रिया ताई तुम्ही लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी आहात. तुमच्या सारख्या घराणेशाहीतून आलेली लोक, घराणेशाहीचेच समर्थन करतील, अशी सडकून टीका वाघमारे यांनी केली. शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे संबंध महाराष्ट्राने मान्य केल्याचा दावाही वाघमारे यांनी केला.

शिंदेंनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व उभं केलं

सुप्रियाताई तुम्ही शरद पवार यासारख्या मोठ्या नेत्याच्या कन्या आहात. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात. खासदारकी आणि आमदारकी तुम्हाला आयती मिळाली. मग तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं आहे. उभं केलं आहे, असे शा‍ब्दिक बाण वाघमारे यांनी सोडले.

शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या न्यायालयाने सुद्धा दिला आहे. तुमच्यासारखी घराणेशाहीतून आलेली माणसं ही घराणेशाहीचेच समर्थन करतात. पण याद राखा हा देश घराणेशाहीवर चालत नाही. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. लोकशाहीवर चालतो. शिवसेना ही शिंदे यांची आहे हे महाराष्ट्राने मान्य केलं आहे. सुप्रियाताई तुमच्या घरात काय जळतंय, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा असा सणसणीत टोलाही वाघमारे यांनी लगावला.

शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात सुरक्षित

शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. विधासभा सभापतींनी दिला आहे. जनतेच्या न्यायालयातही शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित असल्याचा दावा खासदार ज्योती वाघमारे यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *