Petrol, diesel rates : कच्च्या तेलाचे दर वाढताच मोठा झटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल 335 तर डिझेल तब्बल… – Marathi News | BIG hike in petrol and diesel prices in Pakistan once again inflation set to soar


मध्य पूर्वेत पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे, अमेरिकेकडून इराणवर हल्ले करण्यात येत आहेत. इराणकडून देखील अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. अमेरिका इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम हा आता कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ज्याचा फटका हा थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर होताना दिसत आहे. कच्चं तेल महाग झाल्याने अनेक देशांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य माणसांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दर लिटर मागे तब्बल 50 ते 60 रुपयांनी वाढवले होते, त्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल, डिझेल एवढं प्रचंड महागलं की वाढलेल्या दराची संपूर्ण जगभर चर्चा झाली. दरम्यान आता पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.63 रुपयांनी तर डिझेलचे दर 1.55 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये प्रति लिटर पेट्रोलचा दर हा 335.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर हा 338.38 रुपयांवर पोहोचला आहे.

पाकिस्तानात पेट्रोवर प्रति लिटर मागे तब्बल 110 रुपयांचा टॅक्स आकारला जातो, तर डिझेलवर 96 रुपयांचा टॅक्स आकाराला जातो. दरम्यान पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा तेथील जनतेला दर वाढीचा झटका दिल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. आधीच पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाकिस्तानमध्ये सातत्याने इंधनाचे दर वाढतच असल्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत.  तर भारतात देखील काही दिवसांपूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. मात्र आता स्थिर आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *