Sai Sudarshan Out Video : आयपीएल २०२६ मध्ये बेंगळुरू आणि गुजरात यांच्यात झालेल्या क्वालिफायर १ मधील सामन्यामध्ये गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात साई सुदर्शन याची विकेट खूप महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरली. नेमकं काय झालं जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कर्णधार रजत पाटीदारच्या ९३ धावांच्या आक्रमक खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत ‘क्वालिफायर-१’ लढतीत मंगळवारी गुजरात टायटन्स संघावर ९२ धावांनी मात केली. यासह ‘बेंगळुरू’ ने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. गुजरात संघ आता ‘क्वालिफायर-२’ लढतीत ‘हैदराबाद-राजस्थान’ यांच्यातील विजयी संघाशी लढेल. या सामन्यामध्ये असं काही घडलं की कोणालाही विश्वास बसला नाही. गुजरातची पहिली विकेट आरसीबीने घेतली नाही तर त्यांना देऊन टाकली गेली. सामन्यामध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
साई सुदर्शन OUT Video
साई सुदर्शन याने सुरूवातीपासूनच आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडत आपले इरादे स्पष्ट केले होते. पठ्ठ्याने दोन चौकार मारले त्यामुळे सामना अटीतटीचा होईल असे सर्वांना वाटले पण तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्याची भीती तेच घडलं. साईने फटका मारला आणि चेंडू सीमारेषेच्या पार गेल्याने चौकार मिळाला खरा पण इकडे त्याच्या हातातील बॅट निसटली आणि मागे तो हिट विकेट ठरला. या विकेटनंतर गुजरातच्या पाच विकेट पॉवर प्लेच्या आतमध्ये पडल्या त्यामुळे इथेच सर्व सामना फिरला. साईकडे ऑरेंज कॅप असून गिलसह त्याने चांगल्या भागीदारी केल्या असून गुजरातच्या विजयामागे दोघांची भागीदारीचे महत्त्व आहे.
‘बंगळुरू’ने ‘गुजरात विरुद्ध ५ चाद २५४ धावा केल्या. ही आयपीएलच्या प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या ३ बाद २३३ ‘गुजरात ने २०२३मध्ये नोंदवली होती.
रजत पाटीदारच्या प्ले ऑफमध्ये ३३८ धावा आहेत. त्याने सहा डावांत ११२.६६व्या सरासरीने या धावा केल्या आहेत.
‘बंगळुरू’ने २५४ धावा केल्या. ही त्यांची तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. २०१३ मध्ये ‘बेंगळुरू ने पुणे संघाविरुद्ध ५ बाद २६३ धावा केल्या होत्या, तर २०२४मध्ये ‘हैदराबाद ‘विरुद्ध २६२ धावा केल्या होत्या.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा