Eknath Shinde : मोठी बातमी, ऑपरेशन टायगर आधीच एकनाथ शिंदेंना राजकीय झटका बसणार का? तातडीने अमित शाहंच्या भेटीला – Marathi News | Operation tiger Eknath shinde shivsena former minister mlas not happy in party meet bjp leader amit shah in delhi uddhav Thackeray camp


सध्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. हे ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव ठाकरे गटातील नाराज आमदार-खासदारांचा गळाला लावणं. उद्धव ठाकरे गटातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. काही खासदारांनी भेटी सुद्धा घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. उद्धव ठाकरे गटात फाटाफुट होऊ शकते, असं चित्र असलं तरी प्रत्यक्षात एकनाथ शिंदे गटातही सर्वकाही आलबेल नाहीय. शिंदे गटातील अस्वस्थतता चर्चेचा विषय बनली आहे. राजकीय नव्या ‘ऑपरेशन’ची जोरदार चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली. मंत्रिमंडळ विस्तार आणि ‘नव्या ऑपरेशन’ च्या चर्चांना उधाण.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटातील नेत्यांशी संपर्क सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय. काही माजी मंत्री आणि आमदारांमध्ये अस्वस्थतेचे संकेत आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये नाराजी वाढल्याचीही चर्चा आहे. “शिवसेनेतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपेक्षा” असा नेत्यांचा आरोप आहे. दिल्ली दौऱ्यात राजकीय समीकरणांवर महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचाली वाढण्याची शक्यता. शिंदे गटातील नेत्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिंदेंसोबत माजी शिक्षणमंत्री उपस्थित होते

रविवारी एकनाथ शिंदे यांनी अचानक अमित शाह यांची भेट घेतली. भेटी दरम्यान शिंदेंसोबत माजी शिक्षणमंत्री उपस्थित होते. शिंदे आणि शाहंच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसापूर्वी दिल्ली दौरा झाला. या भेटीच्यावेळी स्वीय सहाय्यक, खासदार सोबत नव्हते. त्यांच्यासोबत माजी शिक्षण मंत्री होते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरु आहेत. विधान परिषदेसंदर्भात या निवडणुकीत चर्चा झाली.

इतकी गोपनीयता का बाळगली?

ठाकरे गटातील काही खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यांच्या संदर्भात निर्णय कधीपर्यंत घ्यायचा या बाबत शाहंसोबत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय दौऱ्याबाबत इतकी गोपनीयता का बाळगली? असा प्रश्न उपस्थित होते आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून या बाबत काय भूमिका मांडली जाते, ते लवकरच कळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *