Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार


मुंबई : राजधानी दिल्लीतील आंदोलनास (Agitation) देशभरातून पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य नागरिकही आता दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. तसेच, अनेक मराठी, हिंदी सेलिब्रिटींनीही दिल्लीतील नीट पेपरफुटीविरोधातील उपोषणास बळ देण्याचं आवाहन केलंय. विरोधकांकडून या आंदोलनाची तीव्रता वाढवली जात असून राजकीय पक्ष मोठ्या ताकदीने आंदोलनात सहभागी होत आहेत. एकीकडे आंदोलना देशव्यापी होत असताना दुसरीकडे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman khan) ट्विट करत आंदोलना थांबवण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलंय, तर सोनम वांगचुक (Sonam wangchuk) यांनीही आपलं उपोषण सोडावं, असे आवाहन सलमानने केले आहे. सलमानच्या या ट्विटवर नेटीझन्स आपली प्रतिक्रिया देत आहेत.   

सलमान खानने गुरुवारी ट्विट करुन पहिल्यांदाच दिल्लीतील आंदोलनावर भाष्य केलं होतं. ”दिल्लीतील आंदोलनाचा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातला आहे, याचं राजकारण केलं जाऊ नये. याचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिलं पाहिजे. मला खात्री आहे की, सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल. हे सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल. सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा सर्वांवर ईश्वराची कृपा असो…”  असे सलमानने म्हटले होते. आता, पुन्हा एकदा सलमानने ट्विट करत हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय. 

सलमानने आज पुन्हा एकदा दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य करताना आता उपोषण मागे घ्यायला हवं असं म्हटलंय. विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे आणि मित्र सोनम वांगचुक यांनीही आपलं उपोषण सोडावं, हवं तर मी तुझ्यासाठी घरचं जेवणही पाठवतो, असे सलमान खानने म्हटले आहे. 

शैक्षणिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या विद्यार्थी हेच आपलं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. देशाच्या पंतप्रधानांनी देखील यासंदर्भाने ट्वीट केले आहे. नीट पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर निश्चितच पंतप्रधान कठोर कारवाई करतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी आता आई-वडिलांकडे आणि आपल्या घरी परत जावे, असे आवाहन सलमानने ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. विशेष म्हणजे, सलमानने बिईंग ह्युमन लिहिलेला कपही आपल्या हाती घेतला असून, तसा फोटोही शेअर केला आहे. 

सोनम वांगचुक यांनाही उपोषण सोडण्याचं आवाहन

सलमानने आपल्या ट्विटमध्ये सोनम वांगचुक यांनाही आवाहन केलं आहे. मित्रा सोनम, आता हा विषय संपला आहे, हे आणखी वाढवू नकोस. गरज पडली तर पुढील दिवसांसाठीही तोच उत्साह ठेव, पण तशी गरज पडेल असं मला वाटत नाही. काहीतरी खाऊन घे. हवं असेल तर मी तुझ्यासाठी घरचं जेवणही पाठवतो, असे सलमानने म्हटले आहे. सलमानच्या या ट्विटवर नेटीझन्स प्रतिक्रिया देत आहेत. नेटीझन्सकडून सलमानच्या भूमिकेवर आपलं मत मांडण्यात येत आहे.

हेही वाचा

दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *