4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या ‘रामायण’ सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका


4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या आगामी ‘रामायण’ (Ramayana) सिनेमाची सध्या संपूर्ण देशभरात क्रेझ पाहायला मिळतेय. या सिनेमात बॉलिवूड स्टार (Bollywood Actor) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्री रामांच्या (Lord Shree Ram) भूमिकेत झळकणार आहे. तर, साई पल्लवी सीता माता, साऊथ सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा सिनेमा डोळ्यांचं पारणं फेडणाारा असेल, अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आता या सिनेमातल्या इतर महत्त्वाच्या पात्रांबाबत अपडेट्स समोर येत आहे. आता या भव्यदिव्य ‘रामायण’ सिनेमात दिग्गज मराठी अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती मिळतेय. मराठी अभिनेते अजिंक्य देव ‘रामायण’ सिनेमात दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

कधीकाळी मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळख असलेले अजिंक्य देव यांची नितेश तिवारी दिग्दर्शित 4000 कोटींच्या ‘रामायण’ सिनेमात वर्णी लागली आहे. अजिंक्य देव महर्षी विश्वामित्र यांची भूमिका साकारणार आहेत. रामायणात महर्षी विश्वामित्रांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि मार्गदर्शक होती. महर्षी विश्वामित्र म्हणजे, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाचे मार्गदर्शक आणि गुरू. ज्यांनी राम-लक्ष्मणाला ताडकावधासारख्या संकटातून सोडवलं, तर दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिलं. तर, मिथिला नगरीत नेऊन सीतास्वयंवर आणि विवाहाचा मार्ग सुकर केला होता.

‘रामायण’ची दमदार स्टारकास्ट

  • रणबीर कपूर : प्रभू श्रीराम
  • साई पल्लवी : सीता
  • यश : रावण
  • रवि दुबे : लक्ष्मण
  • रकुल प्रीत सिंह : शूर्पणखा
  • अरुण गोविल : दशरथ
  • लारा दत्ता : कैकेयी
  • सनी देओल : हनुमान
  • विवेक ओबेरॉय : विद्युतजीव
  • काजल अग्रवाल : मंदोदरी
  • शोभना : कैकसी
  • कुणाल कपूर : इंद्रदेव
  • शीबा चड्ढा : मंथरा
  • इंदिरा कृष्णन : कौसल्या

दरम्यान, नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनात बनणारा सिनेमा दोन पार्ट्समध्ये रिलीज केला जाणार आहे. फिल्मचा पहिला पार्ट दिवाशी 2026 मध्ये थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. यानंतर शेवटचा पार्ट 2027 मध्ये रिलीज केला जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ramayan Jatayu: 4000 कोटींच्या ‘रामायण’बाबत मोठा खुलासा; जटायू बनणार ‘हा’ दिग्गज अभिनेता, रावणाशी होणार जबरदस्त लढत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *