मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेट घेतली. विशेष म्हणजे, कालच जंतरमंतरवर जाऊन शरद पवारांनी नीट पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास आपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर, लगेच आज सुप्रिया सुळेंसह नरेंद्र मोदींची (Sunetra Pawar) भेट घेऊन शेतकरी आणि शेतीसंदर्भातील प्रश्नावर चर्चा केल्याची माहिती समोर आली. मात्र, या भेटीनंतर सोशल मीडियातून अनेक अर्थ लावले जात होते. शरद पवारांच्या मोदी भेटीची ही योग्य वेळ नसल्याचाही सूर दिसून आला. त्यानंतर, आता शरद पवारांनी आजच्या भेटीत पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेचा वृत्तांत दिला आहे.
सीजेपी पार्टीसह, विद्यार्थी आणि विरोधक एकीकडे जोर लाऊन आंदोलन करत आहेत, रस्त्यावर उतरत आहेत. उद्धव ठाकरेंकडून आंदोलनासाठी इंडिया आघाडीन एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, दुसरीकडे त्याचदरम्यान शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, आधीच शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे, आजच्या भेटीवर होत असलेल्या चर्चेदरम्यान शरद पवारांनी मोदीभेटीची माहिती दिली. तसेच, पंतप्रधानांना भेटण्यामागचं कारणही सांगितलं.
शरद पवारांनी मोदींच्या भेटीबाबात माहिती देताना म्हटले की, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीदरम्यान मी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पेपरफुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत माझी सविस्तर भूमिका मांडली. यासोबतच शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी व्यवस्थापन तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माननीय पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असे म्हटले आहे.
हेही वाचा
रेवती आऊट, जान्हवी इन… सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर