Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: ‘प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच…’; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, ‘ते’ उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम


Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: सामाजिक आशय असलेल्या बहुचर्चित ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) या कोर्टरूम ड्रामा येत्या 24 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Marathi Actor Shreyas Talpade) आणि अभिनेत्री काजल अग्रवाल (Actress Kajal Aggarwal) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अन्नपदार्थांमध्ये – होणारी भेसळ, कीटकनाशकांचा अतिवापर यामुळे जनतेच्या आरोग्यावर विशेषतः लहान मुलांवर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय याचं वास्तव या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

सध्या FDA च्या धडक कारवायांमुळे सोशल मीडियावर भेसळयुक्त पदार्थांबाबत मोठी चर्चा रंगली आहे. FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अनेक दुकानं, हॉटेल्स आणि दूध डेअरींवर धाड मारत कित्येक टनांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा (Stock Of Adulterated Food Items) सील केला आहे. तेव्हापासूनच भेसळीचं धडकी भरवणारं वास्तव सर्वांसमोर आलं असून यामुळे सर्वसामान्यांना धडकी भरली आहे. काजल आणि श्रेयसचा आगामी सिनेमाही अन्नपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ, यावर आधारित आहे, याच पार्श्वभूमीवर नुकतीच श्रेयास तळपदे आणि काजल अग्रवाल यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली आहे. तुकाराम मुंढे यांची भेट घेतल्यानंतर अभिनेत्री काजल अग्रवाल हिनं सविस्तर पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलंय. 

तुकाराम मुंढे यांच्या भेटीनंतर अभिनेत्री अभिनेत्री काजल अग्रवाल काय म्हणाली? (Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe)

अभिनेत्री काजल अग्रवाल हिनं लिहिलंय की, “सरांना भेटून खरंच खूप छान वाटलं. सर, करत असलेल्या कामाचा मला नेहमीच आदर वाटतो. या भेटीदरम्यान, त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा याचं मी आवर्जून कौतुक केलंय. पण, या चर्चेदरम्यान त्यांनी दिलेलं एक उत्तर माझ्या कायम लक्षात राहणार आहे. सर म्हणाले, प्रामाणिकपणा आणि निष्ठा या गोष्टी माझ्या कामाचा एक भाग आहेत… आणि मुळात हे माझ्या DNA मध्येच आहे. तुम्ही या गोष्टींकडे काहीतरी ‘असाधारण’ म्हणून पाहत असाल तर, यावरूनच प्रामाणिकपणा, निष्ठा किती दुर्मिळ झालीये हे कळून येतं. हीच अलिकडची दुर्दैवी परिस्थिती आहे…, त्यांचं हे उत्तर ऐकून माझ्याही मनात अनेक विचार आले…”

Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम

“आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी दृढनिश्चयाने योग्य ती गोष्ट करायची… अशा प्रेरणादायी व्यक्तीला मी भेटले. सरांसारखे लीडर्स आपल्याला जाणीव करून देतात की, सचोटीनं वागणं हा विशेष गुण नसून, ही प्रत्येकाच्या आयुष्यातली फार सामान्य गोष्ट असायली हवी. प्रत्येकानं असंच खरेपणानं वागलं पाहिजे…”, असं अभिनेत्री काजल अग्रवाल म्हणाली. 

पुढे बोलताना काजल अग्रवाल म्हणाली की, “योगायोग म्हणजे, आमच्या ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) सिनेमातून सुद्धा हाच संदेश देण्यात आलाय. अन्नभेसळ, कीटकनाशकांचा अतिवापर आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे. आपल्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या घटनांकडे फक्त मूकपणे पाहणं, हे आपल्याला ग्राहक म्हणून परवडणारं नाहीये…”

अभिनेता श्रेयस तळपदे नेमकं काय म्हणाला? (Shreyas Talpade Meet Tukaram Mundhe)

अभिनेत्री काजल अग्रवालनं शेअर केलेली पोस्ट मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यानं रिशेअर केली आहे. काजलनं पोस्टमध्ये लिहिलंय की, “सर, तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. तुम्हाला अधिक बळ मिळो, तुम्ही करत असलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा… भारताला तुमच्यासारख्या अनेक लीडर्सची गरज आहे…”

दरम्यान, श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांचा ‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ (The India Story) हा सिनेमा येत्या 24 जुलै 2026 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचा विषय भेसळयुक्त अन्नपदार्थांवर अवलंबून आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shreyas Talpade Reduced Dairy Food Intake In Diet: तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर मराठी अभिनेत्याला भरली धडकी; घरात येणारं दूध, पनीर खाणंच सोडलं, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *