Maruti Suzuki चा दुसरा धक्का! ऑगस्टमध्ये पुन्हा वाढतील किंमती, 30 हजार रुपयांपर्यंत महाग होतील गाड्या  | ऑटो


Last Updated:

तुम्ही ऑगस्टमध्ये Maruti Suzuki ची नवी कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कंपनीने आपल्या पूर्ण मॉडल रेंजच्या किंमतीत 30 हजार रुपयांपर्यंत वाढीची घोषणा केली आहे.

maruti suzuki
maruti suzuki

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या पूर्ण मॉडल रेंजच्या कारच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ करत आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या सूचनेत म्हटलंय की, इनपूट खर्चात सतत वाढ होत असल्याने कारच्या किंमतीत 30,000 रुपयांपर्यंत वाढ होईल. ही वाढ मॉडलच्या हिसोबाने वेगवेगळी असू शकते.

ही मारुतीची या वर्षीची दुसरी सर्वात मोठी प्राइज हाइक आहे. जून 2026 मध्येही कंपनीने किंमतीत 30 हजार रुपयांपर्यंत वाढ केली होती. कंपनीने म्हटलंय की, कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि महागाईचा दबाव शक्य तितका अंतर्गत प्रयत्नांतून पेलण्याचा प्रयत्न केलाय. पण आता त्याचा काही भार ग्राहकांवर टाकावा लागतोय. ग्राहकांवर होणारा परिणाम कमीत कमी राहील, याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न मारुती करतेय.

प्राइज हाइक डिटेल्स 

मारुती सुझुकी ऑगस्ट 2026 पासून आपल्या एंट्री लेव्हल S-Presso पासून प्रीमियम एमपीव्ही Invicto पर्यंत सर्व मॉडल्सच्या किंमती वाढवेल. वाढीची रक्कम मॉडलच्या आधारे वेगवेगळी असेल आणि जास्तीत जास्त 30 हजार रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. कंपनीने स्पष्ट केलंय की, हा निर्णय निरंतर वाढत्या इनपुट खर्चाला पाहून घेतला आहे.

वाढीमागे मुख्य कारण

कंपनीनुसार, कच्च्या मालाचा खर्च, वस्तूंच्या किमती आणि महागाईचा दबाव यामुळे खर्चाची परिस्थिती प्रतिकूल बनली आहे. पश्चिम आशियामध्ये चालू असलेल्या संघर्षानंतर कमोडिटी किंमतींमत वाढ झाली. ज्याचा परिणाम इनपूट खर्चावर झाला. मारुतीने गेल्या काही महिन्यात खर्च कमी करण्यासाठी अतिरिक्त उपाय बनवले आहेत. तरीही, मर्यादित वाव असल्यामुळे आता अंशतः दरवाढ अपरिहार्य झाली आहे.

यावर्षी दुसऱ्यांदा वाढ 

मारुतीने यावर्षी किंमती वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे 2026 मधील घोषणेनंतर जूनमध्येही किंमतीत 30 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली होती. त्यावेळीही प्रोडक्शनसाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ आणि महागाई हीच कारणं दिली होती. ऑगस्ट महिन्यातील ही दरवाढ म्हणजे कंपनीने आपल्या संपूर्ण उत्पादनांच्या श्रेणीसाठी केलेली दुसरी दरवाढ आहे.

विक्रीवर काय परिणाम होईल?

किंमती वाढूनही मारुतीची विक्री सध्याच्या महिन्यांमध्ये स्थिर राहिली आहे. जून 2026 मध्ये कंपनीने 2,00,390 यूनिट्स विकले, ज्यात 1,50,150 यूनिट्स देशांतर्गत बाजारात आणि 42,768 यूनिट्सचा एक्सपोर्ट होता. मे 2026 मध्ये तर कंपनीने आपला ऑलटाइम मंथली रेकॉर्ड बनवला होता. 2,42,688 यूनिट्सची विक्री केली होती. ज्यात डोमेस्टिक रिटेल सेल  1,93,535 यूनिट्स होता.

मराठी बातम्या/ऑटो/

Maruti Suzuki चा दुसरा धक्का! ऑगस्टमध्ये पुन्हा वाढतील किंमती, 30 हजार रुपयांपर्यंत महाग होतील गाड्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *