Last Updated:
Actress Passes Away : वयाच्या अठराव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तिच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबाने आणि स्कूलने दिली आहे.
18 वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही अभिनेत्री आहे केली हॉटल. जिने गॉडझिला व्हर्सेस काँग आणि ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ या फिल्ममध्ये जिया ही भूमिका साकारली होती.
केली हॉटलने 2021 मधील ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ या चित्रपटात जियाची भूमिका साकारली होती. जिया ही एक मूक-बधीर अनाथ मुलगी होती, जिचं ‘किंग काँग’सोबत एक अतिशय खास नातं दाखवण्यात आलं होते. त्यानंतर ती 2024 मध्ये आलेल्या ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ मध्येही याच भूमिकेत दिसली होती.
या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला ‘सॅटर्न अवॉर्ड्स’मध्ये ‘बेस्ट परफॉर्मन्स बाय अ यंगर ॲक्टर’ या श्रेणीत नामांकन मिळालं होतं. 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत केलीने सांगितलं होतं की, तिच्यासाठी संवाद लक्षात ठेवणं कठीण नव्हतं, पण अमेरिकन साईन लँग्वेजनुसार संवादांना जुळवून घेणं हे खूप आव्हानात्मक होतं.
वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी केलीने आपल्या प्रतिभेने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. तिच्या अचानक जाण्याने हॉलीवूड आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
केली हॉटलचा मॅलँड इथं कार अपघातात मृत्यू झाला आहे. तिच्या कुटुंबाने आणि स्कूलने तिच्या निधनाची बातमी दिली आहे. केलीचे वडील जोशुआ हॉटल यांनी ‘अमेरिकन साईन लँग्वेज’ (ASL) मध्ये फेसबुक लाईव्हद्वारे तिच्या निधनाची माहिती दिली. नंतर त्यांनी ‘TMZ’ शी बोलतानाही या दुःखाद घटनेला पुष्टी दिली.
केली ही ‘टेक्सास स्कूल फॉर द डेफ’ची सीनिअर विद्यार्थिनी होती. शाळेने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत तिच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केलं. “आमची सीनिअर विद्यार्थिनी केली हॉटल हिचं मॅलँडमधील फ्रेडरिक इथं एका कार अपघातात निधन झालं आहे, हे सांगताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. या कठीण काळात आमच्या संवेदना तिच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि सर्व चाहत्यांसोबत आहेत.”
यासोबतच शाळेने लोकांनी अपघाताबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवण्याचं आणि कुटुंबाच्या प्रायव्हेसीचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.
Jul 22, 2026 10:32 AM IST
