Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO


Ajit Pawar Birth Anniversary in Baramati: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल मध्यरात्री अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यानंतर बुधवारी सकाळी पवार कुटुंबीय अजित पवार यांचे विमान जिथे कोसळले त्या गोजुबावी गावातील धावपट्टीजवळ आले होते. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील, विजया पाटील हे सगळे कुटुंबीय याठिकाणी आले आणि त्यांनी अजितदादांना फुलं वाहत आदरांजली अर्पण केली. यावेळी अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार यांचा चेहरा अजितदादांच्या आठवणीने रडवेला झाला होता. त्यामुळे याठिकाणी भावूक वातावरण तयार झाले होते. (Ajit Pawar Birth Anniversary)

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना 28 जानेवारीला त्यांचा अपघात झाला होता. ते जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत येत असताना ही दुर्घटना घडली. बारामती विमानतळानजीक असलेल्या गोजुबावी (Gojubavi) गावाच्या हद्दीत अजित पवारांचे चार्टर्ड विमान धावपट्टीवर कोसळले होते. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला होता. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील वैमानिक, केबिन क्रू आणि अजितदादांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबाबत घातपाताच्या शंका व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आतापर्यंतच्या चौकशीत तसे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. 

Sunetra Pawar: अजितदादांसाठी सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट

दादा…एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला…घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा.. पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा…आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ… आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील… माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम…!

आणखी वाचा

Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *