Rahu Gochar 2026 : राहु गोचर मकर राशीत, येणार संघर्षाचा काळ मात्र 4 राशींवर राहू होणार मेहेरबान !


राहूचे गोचर मकर राशीमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. राहू 18 महिन्यांसाठी कुंभ राशीत राहील्यानंतर आता शनिच्या मकर राशीत प्रवेश करेल. राहू 5 डिसेंबरला सकाळी 10 वाजून 32 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. या राहूचे गोचर होताच राहू व शनि यांच्यामध्ये त्रिएकादश योग बनेल. तसेच दोघांमधील चतुर्थ दशम योगही निर्माण होईल. अशा परिस्थितीत राहूच्या या गोचरमुळे भारतासह अनेक देशांतील परिस्थिती आणखीनच कठीण होऊ शकते. मात्र हे गोचर खास करून 4 राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. चला, पाहूया कोणकोणत्या राशींवर राहूच्या या गोचराचा शुभ परिणाम होऊ शकतो.

rahugocharr
राहूचे गोचर मकर राशीत होणार आहे. राहू 5 डिसेंबरला सकाळी 10 वाजून 32 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. राहू नेहमी वक्र चरणात असल्यामुळे कुंभ राशीतून पुन्हा मकर राशीत येईल आणि पुढील 18 महिन्यांपर्यंत शनिच्या राशीत राहील. या दरम्यान राहू व शनि यांच्यामध्ये त्रिएकादश आणि चतुर्थ दशम योगही बनेल. अशा या राहूच्या गोचरमुळे भारतासह जगभरच्या अनेक देशांवर परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी सत्ता परिवर्तन, अपघात अशा शक्यता देखील वर्तवल्या जात आहेत. पण ज्योतिषशास्त्रानुसार हे गोचर काही राशींसाठी अनुकूलही ठरेल. या राशींच्या करियरमध्ये मोठे व शुभ परिवर्तन होईल अशा अपेक्षा आहे. राहूच्या या गोचरामुळे सिंह, तुळ सोबत 2 राशींनाही चांगला लाभ होईल. चला, पाहूया किती राशींसाठी राहूचे हे गोचर शुभ असू शकते.

सिंह राशीवर राहू गोचरचा परिणाम

सिंह राशीवर राहू गोचरचा परिणाम

राहूचे गोचर तुमच्या राशीच्या षष्ठस्थानात होणार आहे. त्यामुळे राहूच्या या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना आपले कार्य करणे सोपे होताना दिसेल. तसेच तुम्ही ज्या गोष्टींसाठी अपार कष्ट व प्रयत्नांवर टिकून असाल, त्यातून तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये खूप काळापासून दुरावा असेल तर तो आता हळूहळू कमी होऊ लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले होईल. आपसात प्रेम वाढेल. तुम्ही नोकरी व्यवसायात सहज यश मिळवाल. याच काळात अनेक ठिकाणी भटकंतीही करता येतील.

तूळ राशीवर राहू गोचरचा परिणाम

तूळ राशीवर राहू गोचरचा परिणाम

तुमच्या राशीतील लोकांसाठी राहूचे गोचर तुमच्या राशीच्या चौथ्या भावात होणार आहे. त्यामुळे आता राहू तुम्हाला उत्पन्नाच्या संधी देईल. मात्र, यावेळी व्यापार किंवा नोकरीत थोडे संघर्षही वाढू शकतात पण तुमची मिळकत चांगली राहील. त्याचबरोबर तुम्ही विदेशात जाण्याच्या योजना करू शकता. या योजनांमध्ये यश मिळेल. तुम्ही विदेशात स्थायिक होण्याचाही विचार करत असाल, तर त्यासाठीही काळ चांगला आहे. इच्छापूर्ती होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृश्चिक राशीवर राहू गोचरचा परिणाम

वृश्चिक राशीवर राहू गोचरचा परिणाम

वृश्चिक राशीतील लोकांसाठी राहूचे गोचर त्यांच्या तिसऱ्या भावात होईल. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभाच्या शुभ संधी मिळू शकतात. तसेच करिअरमधील प्रगतीसाठीही ही वेळ चांगली आहे. मात्र यावेळी तुमचा खर्चही वाढेल त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन कराल. जुन्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आरोग्य देखील चांगले असेल.

मीन राशीवर राहू गोचरचा परिणाम

मीन राशीवर राहू गोचरचा परिणाम

राहूचा गोचर मीन राशीतील लोकांच्या अकराव्या भावात होईल. या वेळी तुमची शनीची साडेसाती देखील सुरू आहे. त्यामुळे या काळात मीन राशींच्या लोकांना बिगडलेल्या कार्यांमध्ये सुधारणा दिसू शकते. त्याचबरोबर, तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. आधीपेक्षा अधिक आनंदी तुम्हाला वाटेल. मात्र, खर्च सुरू राहतील म्हणून काळजी घेऊन काही आर्थिक निर्णय घ्यावेत.

प्रियांका लोंढे

लेखकाबद्दलप्रियांका लोंढेप्रियांका लोंढे महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन सेक्शन मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर आहेत. गेल्या 10 वर्षांपासून मीडिया क्षेत्रात जर्नालिस्ट,कंटेन्ट रायटर म्हणून काम करत आहेत. धार्मिक, सांस्कृतिक,कला,सामाजिक,चित्रपट,वुमन इश्यू,मनोरंजन,वाईल्डलाईफ अशा विविध क्षेत्राशी निगडीत अनेक विषयांवर त्यांनी बातम्या आणि लेख लिहिले आहेत. धार्मिक विषयात लहानपणापासूनच रुची असल्याने व घरातील वातावरण देखील धार्मिक असल्याने त्यांनी पूजापाठ,व्रत,पारायण याची शिकवण आपल्या आईकडून घेतली. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांची आई दत्तगुरूंची सेवा करते. घरात पारायण होतात धार्मिक यात्रा दरवर्षी कुटुंब करते याच गोष्टी त्यांनी बालपणापासून पाहिल्या व आत्मसात केल्या. त्या स्वतः हनुमानजींची भक्ती करतात. आपल्या धार्मिक अनुभवांवरून लेखन करताना वाचकांपर्यंत सत्य धार्मिक लेख,कथा ज्योतिष उपाय त्यांच्या लेखनातून पोहचवतात.

प्रियांका लोंढे यांनी मास्टर इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन टीममध्ये कार्यरत असून ज्योतिष,टॅरोट कार्ड्स,अंकशास्त्र,धार्मिक कथा कहाण्या यामध्ये त्यांना आवड असल्याने त्यांनी यासर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे. आपल्या लेखातून त्या नेहमी ज्योतिषीय बातम्या लिहिताना तथ्य पडताळून योग्य संदर्भ देऊन वाचकांपर्यंत सत्य माहिती पोहचवतात. या बाबतीत त्यांना स्वतःचे अनुभव कामी येतात. प्रियांका स्वतः धार्मिक असल्याने त्या अनेक तीर्थस्थळी यात्रा करतात. आपल्या यात्रेतील अनुभव पाठीशी घेऊन तसेच दैनंदिन पूजापाठ कशाप्रकारे करावी संकल्प कसा घ्यावा मनोकामना प्राप्तीसाठी काय करावे हे सर्व त्या स्वतः अनुभव घेऊन आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत पोहचवतात त्यामुळे त्यांचे लेख वाचकांच्या जास्त जवळ जाऊ शकतात व वाचकांना योग्य ती माहिती मिळते.

धार्मिक लेखनासोबतच प्रियांका लोंढे यांनी महिलांसाठी लेखन केले आहे. त्यांनी लोकमत या वृत्तपत्रात असताना नाईट शिफ्ट करणाऱ्या महिला रात्री प्रवास करताना सुरक्षित असतात का या बाबतीत लोकमत टीमसोबत स्टिंग ऑपरेशन केले होते. ही बातमी वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचली व त्यांच्या टीमचे कौतुक झाले. या स्टिंग ऑपरेशनसाठी त्यांना “रणरागिणी” हा पुरस्कार मिळाला होता. सामाजिक संस्थांसोबत जोडून त्यांनी अनाथ मुले,महिला यांच्या समस्या आपल्या लेखनातून समाजासमोर मांडल्या. सध्या त्या धार्मिक लेखन करत असून आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहचवता यावी यावर विशेष लक्ष देतात. प्रियांका आपल्या लेखात काही ज्योतिष उपाय सांगतात जे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून असतात शिवाय लाल किताब किंवा ज्योतिष एक्सपर्ट यांनी दिलेल्या माहितीवर आधारित लेख त्या लिहितात.

शिक्षण व कार्य अनुभव
– प्रियांकाने 4 वर्ष लोकमत वृत्तपत्रात विविध विषयांवर पत्रकार म्हणून लेखन केले. त्यांनी अनेक स्टोरीज या एक्लुझिव्ह लिहिल्या आहेत. लोकमतसाठी मनोरंजन विभागात काम करताना बऱ्याच सेलिब्रिटीजचे इंटरव्यू घेतले. तसेच अनेक चित्रपटांचे रिव्ह्यू देखील केले आहेत. क्राईम बीटसाठी काम करताना स्टिंग ऑपरेशन केले आहेत.
– ईटीव्ही मराठीमध्ये एंटरटेनमेंट डेस्कसाठी कंटेन्ट एडिटर म्हणून काम केले आहे.
– महाराष्ट्र मीडिया पीआर कंपनीमध्ये VSTF या महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी काम केले. तसेच अनेक नामांकित ब्रँडसाठी कंटेन्ट रायटिंग केले आहे.
– ब्लूपॅड या अँपमध्ये अनेक विषयांवर 1000 हुन अधिक लेख लिहिले आहेत.
– एस्ट्रोटॉक या अँपमध्ये देखील कंटेन्ट रायटर या पदावर काम केले आहे. ज्योतिषीय विषयांवर अभ्यास व रिसर्च करून लेखन केले आहे.
– प्रियांका सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉमच्या एस्ट्रो रिलिजन सेक्शनसाठी कार्यरत आहे. येथे त्या ज्योतिष व धार्मिक विषयांवर स्वतःचे अनुभव, अभ्यास व रिसर्च करून लेख लिहितात.आणखी वाचा