MI vs RR News : आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई आणि राजस्थानमधील सामन्यात पलटणला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह राजस्थान संघाने प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के केले असून चौथ्या स्थानावर त्यांनी उडी घेतली आहे. मात्र आता याचा झटका पंजाब आणि केकेआर बाहेर झाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएलमधील ६९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सुरू आहे. या सामन्यामध्ये राजस्थान संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २०५-८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघ १७५ धावा करू शकला. हा सामना राजस्थान संघाने ३० धावांनी जिंकला. या विजयासह राजस्थानने प्ले ऑफमधील आपले चौथे स्थान पक्के केले आहे. मात्र आता पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ हे प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत.
राजस्थानकडून कोणीही मोठी खेळी केली नाही. पण जवळपास चारपेक्षा जास्त खेळाडूंनी २५ पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. ध्रुव जुरेल याने सर्वाधिक ३८ धावा केलेल्या. राजस्थान संघाची खराब सुरूवात झाली होती. कारण पॉवर प्लेमध्ये ५४ धावसंख्येवर तीन विकेट गमावल्या होत्या. शनाका आणि ध्रव जुरेल यांची २७ चेंडूत ४५ धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. त्यासोबतच जोफ्रा आर्चर आणि शुभम दुबे यांनी शेवटला अवघ्या १३ चेंडूत ३५ धावा केलेल्या, त्यासोबतच बर्गर आणि जोफ्राने १२ चेंडूत ३० धावा करत २०० धावांचा टप्पा पार केला होता. मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच ओव्हरमध्ये ७३ धावा दिल्या आणि तिथेच सामना हातून निसटला गेला. कारण १५ ओव्हरमध्ये १३२-५ धावा असणाऱ्या राजस्थानची धावसंख्या पाच ओव्हरमध्ये २०५ झाली. मुंबईकडून दीपक चहर आणि शार्दूर ठाकूर याने दोन तर विल जॅक्ससह बॉशने एक-एक विकेट नावावर केली. Sara Tendulkar : लाखात एक नणंद! साराच्या पोस्टमध्ये युजरने सानिया वहिनीला वगळल्याने तिचा एकच शब्दात कडक रिप्लाय, लाईक्सचा पडला पाऊस मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन उतरले होते. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्माला शून्यावरच आर्चरने आऊट करत पहिला धक्का दिला. त्यापाठोपाठ रिकल्टन १२ धावा आणि नमन धीर ६ धावा करून आऊट झाला. त्यामुळे मुंबईची खराब अवस्था झाली. कॅप्टन हार्दिक पंड्याने ३४ धावांची आक्रमक खेळी करत आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र तोसुद्धा आऊट झाल्याने मुंबई पूर्णपणे बॅकफूटला गेली. तर एकट्या सूर्यकुमार यादव याने ६० धावांची खेळी करत संघर्ष केला मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. २० ओव्हरमध्ये १७५-९ धावाच करता आल्या.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा