Actress On Twisha Sharma Death Case : सध्या ट्विशा शर्मा प्रकरण चर्चेत आहे. आता लोकप्रिय अभिनेत्री सेलिना जेटलीनं यासंदर्भात भाष्य केलं असून लग्न हे कधीकधी हिंसेचं रूप असतं, असं म्हटलंय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सेलिना जेटली अनेक वैयक्तिक वादांमुळे चर्चेत आहे. पती पीटर हागसोबत अभिनेत्रीची घटस्फोटाची केस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सेलिनानं खुलासा केला की, मुलांचा ताबा आणि ऑस्ट्रियन कौटुंबिक न्यायालयाचे आदेश असूनही, तिला तिच्या मुलांना भेटता येत नाहीये. अशातच आता अभिनेत्रीनं सोशल मीडियावर ट्विशा शर्मा प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे.
सेलिना जेटलीची भावनिक पोस्ट
सेलिना जेटलीनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘ट्विशा शर्माच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. एक सुशिक्षित, सुंदर स्त्रीचं आयुष्य बंद दाराआड होणाऱ्या अत्याचार, एकाकीपणा, भावनिक वेदना आणि हिंसेनं व्यापलं होतं. आणि तिच्या अस्थी अजून थंड नाही झाल्या, तिचं दुःखी कुटुंब उत्तरांची आणि आपल्या मुलीसाठी न्यायाची याचना करत आहे.’
देऊळ बंद २ वेळी पायात बाभळीचा काटा रुतला, पाय बधिर झाला; मोहन जोशींनी किस्सा सांगितला
‘अत्याचार केवळ व्रणांपुरते मर्यादित नसतात’
‘कधीकधी स्त्रियांचं दुःख इतकं सामान्य होऊन जातं की, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी ते महत्त्वाचं राहत नाही. लग्न नेहमीच सुखी असेल असं नाही. कधीकधी हिंसेचं सर्वात एकाकी स्वरूप असं असतं, ते कोणाच्याही नजरेस पडत नाही. अत्याचार केवळ व्रणांपुरते मर्यादित नसतात. कधीकधी तो एकाकीपणा असतो. कधीकधी तो स्वतःच्याच जगापासून हळूहळू दुरावण्याचा अनुभव असतो. कधीकधी तो कुटुंबाशिवाय, आधाराशिवाय, राहायला जागा नसताना एका अनोळखी ठिकाणी एकटं पडण्याचा अनुभव असतो.’ ‘माझ्या बाबतीत, माझे आई-वडील या जगात नाहीत, मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नव्हते आणि त्यात भर म्हणजे, मला तीन लहान मुलं होती. अनेक स्त्रियांप्रमाणे, मी गरजेपेक्षा जास्त काळ तिथे राहिले कारण मला वाटलं की, माझं कुटुंब एकत्र राहणं योग्य आहे. माझ्या मुलांना त्रास होऊ नये असं मला वाटायचं. मला आधार देणारं कोणीही नव्हतं आणि मला कितीही एकटं वाटत असलं तरी हे कबूल करायला मला लाज वाटत होती. काळाबरोबर एकटेपणा अधिकच वाढतो.’ असं सेलिनानं पुढे म्हटलंय. Sai Tamhankar : ‘जे काही आहे ते तोंडावर बोलते, ती मागे बोलत नाही’ सई ताम्हणकरने सांगितला उषा नाडकर्णींसोबत काम करण्याचा अनुभव दरम्यान, २०२५ च्या नोव्हेंबरमध्ये, सेलिनानं तिचा पती पीटर हागच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि फसवणुकीचा आरोप करत खटला दाखल केला आणि ५० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. महाभारत मालिकेतले नकुल आणि सहदेव होते खरे सख्खे भाऊ, पण एकाचा अमेरिकेत अंत तर दुसरा प्रसिद्धीपासून दूर ट्विशा शर्माच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी रविवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील एम्सच्या एका पथकानं तिच्या मृतदेहाचं दुसरं पोस्टमार्टम केलेलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा