21 Jul 2026 08:52 AM (IST)
विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी चालवणारा कायर बघितला- संदिप देशपांडे
‘आम्ही जालियनवाला बागमध्ये गोळ्या झाडणारा जनरल डायर नाही बघितला, पण विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी चालवणारा कायर बघितला,’ असं ट्विट करत मनसेच्या संदिप देशपांडेंनी सरकारला सुनावलं आहे.
आम्ही जालियन वाला बाग मध्ये गोळ्या झाडणारा जनरल डायर नाही बघितला पण विद्यर्थ्यांवर अमानुष पणे लाठी चालवणारा “कायर “बघितला pic.twitter.com/hnnX2Bb5QX
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 21, 2026
21 Jul 2026 08:44 AM (IST)
आंदोलनात पोलिसांना झापणाऱ्या महिलेचा व्हिडीओ राऊतांकडून ट्विट
दादरमध्ये आंदोलनादरम्यान एका महिलेनं पोलिसांना झापलं. खासदार संजय राऊत यांनी व्हिडीओ ट्विट करत महिलेचं कौतुक केलं. हाच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल, असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय. दादरमधील चैत्यभूमी परिसरातील आंदोलनाचा व्हिडीओ राऊतांनी ट्विट केला आहे.
21 Jul 2026 08:40 AM (IST)
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतरवरील सुरक्षा व्यवस्था कडक
दिल्ली: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) ‘संसद चलो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जंतर-मंतरवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
VIDEO | Delhi: Security has been beefed up at Jantar Mantar, a day after the Cockroach Janta Party’s (CJP) “Sansad Chalo” protest.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/jvY8ZKXc4C
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2026
21 Jul 2026 08:35 AM (IST)
जंतर मंतरवरील आंदोलनात 118 पोलीस जखमी
सोमवारी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान तैनात असलेल्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलांमधील ११८ हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. यामध्ये विशेष आयुक्त, सह-आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
21 Jul 2026 08:28 AM (IST)
अँटिलिया बॉम्बस्फोट कट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 1 ऑगस्ट रोजी आरोप निश्चिती
अँटिलिया बॉम्बस्फोट कट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 1 ऑगस्ट रोजी विशेष न्यायालय आरोप निश्चित करणार आहे. या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेसह 10 आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर आरोपींनी दोष नाकारल्यास खटल्याची सुनावणी सुरू होईल. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही आढळली होती. आरोपींवर UAPA आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल असून कमाल शिक्षा फाशीची आहे.
21 Jul 2026 08:27 AM (IST)
विशेष मकोका न्यायालयाकडून अनमोल बिश्नोईविरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी
मुंबई पोलिसांना फटकारल्यानंतर विशेष मकोका न्यायालयाने अनमोल बिश्नोईविरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी केलं. बाबा सिद्दीक हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईला अटक करून त्याची कोठडीत चौकशी करता यावी यासाठी मुंबईतील विशेष मकोका न्यायालयाने त्याच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी केलं आहे. भारतात उपलब्ध असूनही त्याची कोठडी मिळवण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई पोलिसांना जाब विचारल्यानंतर न्यायालयाने ही कारवाई केली आहे.
विशेष मकोका न्यायालयाने फटकारल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येप्रकरणी गुंड अनमोल बिश्नोईला अटक करून त्याची कोठडीत चौकशी करण्यासाठी अभियोजन पक्षाने सोमवारी त्याच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट मिळवलं आहे.
21 Jul 2026 08:25 AM (IST)
केंद्रातील मंत्र्यांनी इथं येऊन चर्चा करावी, आंदोलकांची भूमिका
दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थी जमायला सुरुवात झाली आहे. आजदेखील संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केंद्रातील मंत्र्यांनी इथं येऊन चर्चा करावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. कालपेक्षा अधिक विद्यार्थी आज दिल्लीत येतील, असा दावा आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी केला आहे.