नेटवर्क नसलेल्या फागात UPI पेमेंट होत नाहीये? NPCI आणतंय नवं फीचर, इंटरनेटशिवाय होईल पेमेंट  | बिझनेस


Last Updated:

नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया 2026 मध्ये प्रमुख टर्मिनल तयार करणाऱ्या कंपन्यांच्या PoS डिव्हाइसला सर्टिफाय करणं सुरू करू शकतात.

यूपीआय एआय सर्व्हिस
यूपीआय एआय सर्व्हिस

मुंबई : आजच्या काळात यूपीआयचा वापर प्रचंड वाढला आहे. लोकं आता कॅश बाळगत नाहीत. 10 रुपयांची वस्तू असो किंवा 10 हजारांची लोकं यूपीआयने पेमेंट करतात. पण जिथे इंटरनेट नसतं तिथे यूपीआय पेमेंट करणं कठीण होतं. पण आता लवकरच इंटरनेटशवाय यूपीआय पेमेंट करणं सोपं होऊ शकेल. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाची माहिती ठेवणाऱ्या तीन लोकांनी म्हटलंय की, भारत एक अशी यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस सुविधा विकसित करतेय. ज्यामुळे ग्राहक मर्चेंटच्या पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनलवर तोपर्यंतच पेमेंट करू शकतील. जोपर्यंत दोन्हीही डिव्हाइसमध्ये इंटरनेट नसेल.

रिपोर्टनुसार, नॅशनल पेमेंट्स कॉपोरेशन ऑफ इंडिया 2026 मध्ये प्रमुख टर्मिनल तयार करणाऱ्या कंपन्यांचे PoS डिव्हाइसला सर्टिफाय करणं सुरू करू शकतं. प्रस्तावित सिस्टममध्ये नियर-फिल्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर होईल आणि NFC-इनेबल्ड फोनला ऑफलाइन टर्मिनलवर टॅप करुन 2,000 रुपयांपर्यंतचा पेमेंट केला जाऊ शकेल.

रिपोर्टमध्ये म्हटलंय की, हे फीचर अशा जागांसाठी तयार केलं आहे. जिथे कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही किंवा विश्वासार्ह नाही. ज्यात हवाई जहाजाचे केबिन आणि अंडरग्राउंड नेटवर्कचा समावेश आहे. ग्राहक आधीच्या इंटरनेटशी कनेक्ट झाल्यावर आपल्या डिव्हाइसवर उपलब्ध UPI लाइट व्हॉटेलमध्ये पैसे लोड करू शकतील. यानंतर ते यूपीआय पिन न टाकता ऑफलाइन टर्मिनलवर त्या बॅलेन्सचा वापर करू शकतील.

NPCI कडून सर्टिफिकेशनची गरज 

या प्रकरणांची माहिती ठेवणाऱ्या एका फिनटेक फर्मच्या व्यक्तीने मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय की, ऑफलाइन सेटिंगमध्ये UPI पेमेंट स्वीकारण्यासाठी PoS कंपन्यांना NPCI कडून सर्टिफिकेशनची गरज असेल. सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर ते याच्या आधारावर एक अॅप्लिकेशन तयार करू शकतात.

PoS टर्मिनल मर्चेंटकटचा हार्डवेयर असतो. ज्याचा वापर सामान्यतः डेबिट आणि क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड आणि मोबाईल-वॉलेट पेमेंट स्वीकार करण्यासाठी केला जातो. प्रस्तावित सिस्टम अंतर्गत टर्मिनल पेमेंट ऑथरायजेशनला स्टोअर करेल आणि कनेक्टिव्हिटी परत आल्यावर त्यांला पुढे पाठवेल.

दुसऱ्या व्यक्तीने बीएसच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, यूपीआय अॅप्ससाठी NFC-बेस्ड यूज-केस आहे. तुम्ही अॅपचा वापर करुन टॅप कराल. मग टर्मिनल ऑफलाइन असो, तुम्ही 2 हजार रुपयांपर्यंत पेमेंट यावर करू शकता. हे ऑथराइजेशनला कॅप्चर करेल आणि नेटवर्क बहाल झाल्यावर व्हेरिफिकेशनसाठी नंतर पाठवेल. त्या व्यक्तीनुसार, बँक आणि थर्ड-पार्टी UPI अॅप्लिकेशन प्रोव्हायडरही आपल्या अॅप्समध्ये ही सुविधा जोडण्यावर काम करत आहेत.

UPI लाइट X ने काय होईल बदल?

प्रस्तावित फीचर NPCI द्वारे NFC चा पहिला वापर किंवा ऑफलाइन मर्चेंट-पेमेंटची पहिली डॉक्यूमेंटेड पद्धत नाही. तथापि, यामुळे अशा प्रकारची पेमेंट्स सर्टिफाइड पारंपारिक PoS टर्मिनल्सवरही करता येतील. मोबाईल कनेक्टिव्हिटी नसतानाही व्यवहार करता यावेत, यासाठी NPCI ने सप्टेंबर 2023 मध्ये ‘UPI Lite X’ सुरू केले होते.

UPI Lite च्या विपरीत—ज्यासाठी पाठवणाऱ्याच्या बँकेच्या ‘कोअर बँकिंग सिस्टम’चा रिअल-टाइम ॲक्सेस लागत नाही पण तरीही सामान्यतः कनेक्टिव्हिटीची गरज असते—’Lite X’ हे पूर्णपणे ऑफलाइन पेमेंटसाठी डिझाइन करण्यात आलं होतं.

NPCI च्या जानेवारी 2024 च्या UPI Lite X गाइडलाइन्समध्ये NFC-इनेबल्ड फोनच्या मध्ये ऑफलाइन पर्सन-टू-पर्सन पेमेंट आणि  NFC-इनेबल्ड QR कोड, साउंडबॉक्स किंवा स्टिकरला टॅप करुन पर्सन-टू-पर्सन पेमेंटविषयी माहिती दिली होती. सध्या सांगितलेल्या क्षमतेत अंतर एक्सेप्टेंस हार्डवेयरचा आहे. मर्जेंटला NPCI-सर्टिफाइड PoS टर्मिनलच्या माध्यमातून पेमेंट मिळेल. अगदी टर्मिनल डिस्कनेक्ट केलेले असतानाही.

जून 2026 मध्ये अपडेट केलेली NPCI ची BHIM-UPI ब्रांडिंग गाइडलाइन्समध्ये NFC-इनेबल्ड स्टॅटिक आणि डायनामिक QR कोड आणि साउंडबॉक्ससाठी डिझाइन स्पेसिफिकेशनचा समावेश आहे. ज्यावर “Scan or Tap to Pay” चे निर्देश असतात. त्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये व्यापाऱ्यांसाठीच्या प्रेझेंटेशनचा समावेश आहे, परंतु सांगितलेल्या ऑफलाइन PoS सर्टिफिकेशन प्रोग्रामची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

मराठी बातम्या/मनी/

नेटवर्क नसलेल्या फागात UPI पेमेंट होत नाहीये? NPCI आणतंय नवं फीचर, इंटरनेटशिवाय होईल पेमेंट 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *