Desi Bling: ‘नवरा रोज वेगवेगळ्या मुलींसोबत जात असेल तर अडचण नाहीए,पण प्रत्येकवेळी एकच मुलगी असेल तर प्रॉब्लेम, अब्जाधीशाच्या पत्नीचं वक्तव्य’, अभिनेत्रींनी चांगलंच सुनावलं


मुंबई: ओटीटीवरच्या ‘ देशी ब्लिंग ‘ या नव्या रिअॅलिटी शोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या शोमध्ये काही कलाकार आणि बिझनेस क्षेत्रातील काही श्रीमंत मंडळी सहभागी झाले आहेत. यांची लाइफस्टाइल, यांचे नातेसंबंध यांची बरीच चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. पण याच मंडळींनी अरे काही न पटणारे अन् चक्रावणारे दावे केले आहेत. तसंच एका बिझनेसमनच्या पत्नीनं भलतंच वक्तव्य केल्याचंही दिसून आलं.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये अब्जाधीश जोडपे सतीश सनपाल आणि त्याची पत्नी तबिंदा सनपाल यांनी वैवाहिक आयुष्यातील ‘फसवणुकीबाबत’ केलेल्या एका वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे.

Maharashtra TimesMangesh Desai: ”धर्मवीर’च्या तिसऱ्या भागाचं नाव बदलणार, धक्कादायक वास्तव समोर आणणार , निर्माते मंगेश देसाईंचा मोठा खुलासा, Dharmaveer 3 ची उत्सुकता वाढली
प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या लक्ष्मी आर. अय्यर यांनी या जोडप्यावर जोरदार टीका करत, ते समाजात नात्यातल्या फसवणुकीला पाठिंबा देत असल्याचं तिनं म्हटलं.

‘देशी ब्लिंग’ नेमकं काय घडलं?

शोच्या एका भागात तबिंदा सनपाल हिनं तिचा पती सतीशच्या पार्टी करण्याच्या सवयींबद्दल भाष्य केलं. तबिंदा म्हणाली की,”सतीश पार्ट्यांमध्ये जातो आणि तो तिथं वेगवेगळ्या मुलींसोबत असतो हे मला माहीत आहे. जोपर्यंत तिथं प्रत्येक वेळी वेगळी मुलगी असते, तोपर्यंत मला काही अडचण नाहीए. पण जर प्रत्येक वेळी तीच मुलगी असेल, तर मात्र काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. सतीशची पार्टी मुलींशिवाय असूच शकत नाही, असंही ती म्हणाली.

Maharashtra Times‘माझ्याकडे मर्सिडीज होती पण लॉकडाऊन नंतर मला सगळं विकावं लागलं’ Sanjay Jadhav यांनी सांगितला मित्रांच्या साथीचा किस्सा
तबिंदा च्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि युझर्सनी यावर तीव्र आक्षेप घेतला.’मॉडर्न आणि कूल असण्याच्या नावाखाली हा मूर्खपणा थांबवा’ असंही लक्ष्मी आर. अय्यर यांनी म्हटलं..

‘अप्पा’ (2017) आणि ‘फर्स्ट सेकंड चान्स’ (2022) सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शिका लक्ष्मी आर. अय्यर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या मानसिकतेचा तीव्र निषेध केला. त्यांनी लिहिलं की, मी एका रिअॅलिटी शोची क्लिप पाहिली, जिथं एक पत्नी म्हणतेय की, जोपर्यंत तिचा पती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मुलीसोबत फिरतोय, तिची फसवणूक करतोय, तोपर्यंत तिची काही हरकत नाहीए. मॉडर्न (आधुनिक) किंवा ‘कूल’ दिसण्याच्या नावाखाली हा मूर्खपणा आणि असलं भयानक आदर्श समाजासमोर ठेवणं थांबवा.आजही जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं आणि प्रामाणिक असणं हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाला तुमच्या विचारांवर ताबा मिळवू देऊ नका.

तर टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिचीही प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे.लक्ष्मी आर. अय्यर यांच्या या पोस्टवर टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने देखील उपरोधिक कमेंट केली. तिने लिहिले, हो, कारण एकाच महिलेला वारंवार भेटल्यास पुरुषाला तिच्यावर प्रेम जडण्याची शक्यता असते ना .

दरम्यान, सोशल मीडिया युजर्सनीही या जोडप्याला ट्रोल केलं आहे. एका युझरनं लिहिलं की, “आता पत्नीच पतीच्या अशा वागण्याला सामान्य ठरवू लागल्या आहेत का?” तर शोमधील सह-कलाकार तेजस्वी प्रकाशने यावर टोमणा मारताना म्हटलं की, “जर घरात ४० किलो सोने असेल, तर या सगळ्या गोष्टी चालतात असंच कदाचित त्यांना वाटत असावं.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *