Last Updated:
Avengers: Doomsday चा ट्रेलर अखेर आला आहे, ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन, ट्विस्ट आणि अनेक धक्कादायक सीन आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली आणि मार्व्हल लव्हर्स ज्या सिनेमाची वाट पाहत होते त्या ‘Avengers: Doomsday’ चा अखेर ट्रेलर रिलीज झाला आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील खास हिरोचं जोरदार कमबॅक झालं आहे. विशेष म्हणजे, थॉर, कॅप्टन अमेरिका यांचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे हा सिनेमा मार्वल लव्हर्ससाठी एक वेगळीच मेजवणी असणार आहे.
Avengers: Doomsday चा ट्रेलर अखेर आला आहे, ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन, ट्विस्ट आणि अनेक धक्कादायक सीन आहे. आयर मॅन भूमिका निभावणारेह रॉबर्ट डाउनी ज्युनिअरचं कमबॅक झालं असून तो आता व्हिलनच्या रुपात आहे. MCU चा सर्वात खतरनाक ‘डॉक्टर डूम’च्या भूमिकेत रॉबर्ट डाउनी ज्युनिअर दिसत आहे.
‘Avengers: Doomsday’ मध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनिअर अनेक वर्ष आयर मॅन म्हणून टोनी स्टार्कचा रोल करत होते. पण, अव्हजेर अँड गेममध्ये आयरन मॅनचं निधन दाखवलं आहे. पण आता या Avengers: Doomsday डॉक्टर डूमचा मास्क घालून पडद्यावर परतला आहे. ट्रेलरमध्ये पहिल्यांदाच त्याचा संपूर्ण लूक दाखवण्यात आला आहे
हाय-व्होल्टेज अॅक्शन आणि कुठल्या तरी युद्धाची तयारी पुन्हा एकदा दाखवत आहे, या ट्रेलरमध्ये लेटिशिया राईटची ब्लॅक पँथर, ख्रिस हेम्सवर्थचा थॉर, जेम्स मार्सडेनचा सायकक्लोप्स आणि फॅन्टॅस्टिक फोरचे हिरो दिसत आहे. एवढंच नाहीतर कॅप्टन अमेरिका आणि थॉरची सुद्धा एंट्री दाखवली आहे.
‘Avengers: Doomsday’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शक जो रुसो आणि अँथनी रुसो एकत्र काम करत आहेत. या सिनेमामध्ये कथा मायकेल वाल्ड्रॉन आणि स्टीफन मॅकफीली यांनी लिहिली आहे. यावेळी कथा केवळ एका सुपरहिरोची नसून संपूर्ण मार्वल युनिव्हर्सच्या भविष्याची असेल, हे ट्रेलरवरून स्पष्ट झालंय.
ख्रिस हेम्सवर्थ थोर म्हणून परतला आहे, तर ख्रिस इव्हान्स देखील कलाकारांचा भाग आहे. अँथनी मॅकी सॅम विल्सन, सध्याचा कॅप्टन अमेरिका म्हणून आपली भूमिका पुन्हा साकारत आहे. टॉम हिडलस्टन, सेबॅस्टियन स्टॅन, पॉल रूड, सिमू लिऊ आणि फ्लोरेन्स पुघ हे इतर परिचित MCU चेहरे या सिनेमात दिसत आहे. फॅन्टॅस्टिक फोर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, ज्यात पेड्रो पास्कल रीड रिचर्ड्स म्हणून, व्हेनेसा किर्बी सू स्टॉर्म म्हणून, जोसेफ क्विन जॉनी स्टॉर्म म्हणून आणि एबॉन मॉस-बॅचराच बेन ग्रिम म्हणून दिसणार आहेत.
एक्स-मेन सिनेमातील अनेक कलाकार अव्हेंजर्स डूम्ससाठी परत येत आहेत. पॅट्रिक स्टुअर्ट प्रोफेसर एक्स म्हणून परतला आहे, इयान मॅककेलन मॅग्नेटो म्हणून परतला आहे आणि जेम्स मार्सडेन सायक्लॉप्स म्हणून परतला आहे. केल्सी ग्रॅमर, अॅलन कमिंग आणि रेबेका रोमिजन देखील या कलाकारांचा भाग आहेत.
‘Avengers: Doomsday’ हा चित्रपट १८ डिसेंबरला जगभरात प्रसिद्ध होणार आहे. 18 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात केवळ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध असेल, ज्यात प्रीमियम फॉरमॅटचाही समावेश आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 20, 2026 11:48 PM IST
Avengers: Doomsday : ‘कुछ होने वाला है!’ कॅप्टन अमेरिका इज बॅक, Fantastic 4 आणि Thor ची धमाल, ट्रेलरमध्ये स्टोरी समोर
