गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश


Delhi Jantar Mantar Protest:शिक्षण क्षेत्रातील पेपर फुटीचे गैरप्रकार रोखणे आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आज (20 जुलै) देशभरात निदर्शनांचा भडका उडाला. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या आवाहनानंतर राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर हे या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनले. दिल्लीसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आणि लडाखमध्ये या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. यामध्ये अनेकांची डोकी फोडली गेली. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. देशासह महाराष्ट्रात सुद्धा आंदोलनाचा भडका उडाला. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातही विद्यार्थी रस्त्यावर उतरले. 

दिल्ली पोलिसांनी सकाळीच मोर्चाला सुरू होण्यापूर्वी बळाचा वापर करताना अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर आंदोलकांना करंट सुद्धा दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. अनेक आंदोलकांनी बॅरिकेड्सना हात लावल्यानंतर करंट बसल्याचा गंभीर आरोप केला. या संदर्भात काही पत्रकारांनी पोलिसांना विचारला असता पोलिसांनी त्यावरती कोणतही उत्तर न देता ‘बाजूला व्हा, बाजूला व्हा’ अशा पद्धतीने उत्तर दिली. त्यामुळे दिल्लीमध्ये दिल्ली पोलिसांची दमनशाही सुरू आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लेह आणि कारगिलमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन केले. जम्मू आणि हिमाचल प्रदेशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर, शेकडो समर्थक व CJP कार्यकर्ते रात्रभर जंतर-मंतरवरच ठाण मांडून होते. आज सकाळी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो आणि CJP संस्थापक अभिजित दीपके यांनी आंदोलनाची सूत्रे हाती घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली जिल्ह्यात कलम 163 (प्रतिबंधात्मक हुकूम) लागू केला आणि हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत परिसर मोकळा करण्याचे आदेश दिले.

गीतांजली यांना केसाला धरून खेचलं

संसदेच्या 150 मीटर अंतरावर विद्यार्थी पोहोचले असून त्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून अमानुष पद्धतीने बळाचा वापर केला जात आहे. इतकेच नव्हे तर तब्बल 40 ते 50 जणांची डोकी फोडण्यात आली असून अनेकांना रक्तबंबाळ करण्यात आलं आहे. अनेक तरुणांना, विद्यार्थ्यांना रस्त्यावरच पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली असून अनेकांना गंभीर पद्धतीने मारहाण केली आहे. अनेक तरुणींची सुद्धा डोकी फोडण्यात आली आहे. दरम्यान, काॅकरोच जनता पार्टीने ट्वीट करत सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना सुद्धा केसाला धरून खेचल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर 12 वर्षांच्या मुलीसह 40 ते 50 जणांची डोकी फोडून फोडली, असा गंभीर आरोप काँग्रेस जनता पार्टीने ट्वीट करत केला आहे. 

संसदेपासून अवघ्या 200 मीटरवर संघर्ष

जंतर-मंतर आणि मंदी हाऊस मेट्रो स्टेशनजवळ जमलेल्या शेकडो आंदोलकांनी संसदेवर धडक देण्यासाठी ‘चलो संसद’ मोर्चा सुरू केला. संसद मार्गावर पोलिसांनी उभारलेले मोठे लोखंडी बॅरिकेड्स आंदोलकांनी खेचून पाडले आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी रायसीना रोड आणि संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळ आंदोलकांना अडवले. संसदेच्या इमारतीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला.

लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर

आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर केला. मंडी हाऊस आणि संसद मार्गावर पुढे सरकणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तसेच रायसीना रोडवर बॅरिकेड्स तोडणाऱ्या आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटरीएट सह 5 महत्त्वाच्या मेट्रो स्टेशनचे दरवाजे बंद करण्यात आले.

धक्काबुक्कीचे आरोप

पोलिसांच्या कारवाईदरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्यासह इतर आंदोलकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप CJP ने केला आहे. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांचे अनेक खासदार आणि प्रमुख नागरिक घटनास्थळी पोहोचले.

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *