Kushal Badrike on CM Devendra Fadnavis Badlapur Show: ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोचा (Comedy Show) चाहतावर्ग केवळ महाराष्ट्र पुरते मर्यादित नाही. तर, जगभरात या शोच्या चाहत्यावर्गाचं जाळं पसरलेलं आहे. या शोमुळे कलाकारांना (Kushal Badrike) विशेष ओळख मिळाली. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यासह या शोमधील इतर कलाकारांना विशेष ओळख मिळाली. प्रेक्षकांनीही या कलाकारांवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला. या शोमध्ये आतापर्यंत नेते मंडळींपासून सिनेकलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान, परफॉर्म करताना कधी दडपण आलं आहे का? (CM Devendra fadnavis) या प्रश्नाचं उत्तर देताना कुशल बद्रिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्किट सादर करतानाचा अनुभव सांगितला.
अलिकडेच कुशल बद्रिकेने ‘सर्व काही’ या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्किट सादर करतानाचा किस्सा सांगितला. कुशल म्हणाला, ‘बदलापूरमधील एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. मी भाऊ कदम, श्रेया बुगडे, आम्ही तिघे परफॉर्म करणार होतो. त्या कार्यक्रमात खास पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर येणार होते. ते येणार होते, शुभेच्छा देऊन निघणार होते, हे आम्हाला ठाऊक होतं’.
कुशल बद्रिकेनं सांगितला ‘चला हवा येऊ द्या’मधील खास किस्सा (Kushal Badrike on CM Devendra Fadnavis Chala hawa Yeu Dya)
‘आयोजकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहज प्रश्न विचारला की, पुढे काय? तेव्हा आयोजकांनी, ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमचं स्किट आहे, असं त्यांनी उत्तर दिलं. तर ते म्हणाले की, हो… मग मी बसतो, त्यांचं स्किट बघून जाईल. ते कार्यक्रमात बसले. यानंतर आयोजक धावत धावत आमच्याकडे आला. म्हणाला की, ऐका.. मुख्यमंत्री फडणवीस साहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी बसले होते. आम्ही सुरुवातीला रिलॅक्स होतो, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत, हे आम्हाला ठाऊक होतं, पण ते शुभेच्छा देऊन जाणार एवढंच माहित होतं. मग आम्ही पुन्हा एकदा Rehearsal केली’.
‘कारण मनात एक धाकधुक सुरु असते की, इतका मोठा व्यक्ती आपल्यावर इचकं प्रेम करतो, हे दडपण आपल्याला येतंच’, असं कुशल बद्रिके म्हणाला. कुशल बद्रिकेने हा किस्सा ‘सर्वकाही’ या यूट्यूबच्या पॉडकास्टवर शेअर केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: