Isha Keskar: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘जय मल्हार’ या मालिकेतील बानूची भूमिका असेल किंवा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’मधील ‘कला’ ची भूमिका असेल. दोन्ही भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली. मात्र, दोन्ही मालिका मधूनच सोडल्यामुळे इंडस्ट्रीत ‘ही मालिका सोडणारी अभिनेत्री’ असल्याची टीका कायम होताना दिसते. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत मालिका सोडल्याचं कारण तिने सांगितलं आहे. त्यासोबतच अनेक विषयांवर ती बोलली आहे. एखाद्या भूमिकेसाठी कलाकारांना अनेकदा इंटीमेट, बोल्ड सीन द्यावे लागतात. अंग प्रदर्शन करणारे कपडेही घालावे लागतात.अनेकदा अशी काम स्वीकारताना कलाकार आपल्याला बंधनं घालतात. यावरून अभिनेत्री ईशा केसकरने केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. ‘राजश्री मराठी’ला ती बोलत होती.
काय म्हणाली ईशा केसकर?
तुझ्या विचारांमुळे, एथिक्समुळे कधी एखादा प्रोजेक्ट ना करावा लागलाय का? असं विचारल्यानंतर ईशा म्हणाली ‘माझ्याकडे एक प्रोजेक्ट आला होता, ज्यात मला विचारण्यात आलं होतं की, तुला स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. त्यात भूमिका अशी काही नव्हती. पण केवळ ऑब्जेक्टिफिकेशन म्हणून ते करायचं होतं. त्यामुळे तो तिने नाकारल्याचे तिने सांगितलं. ती म्हणाली ‘मी एक वेगळ्या धाटणीची अभिनेत्री आहे. एखाद्या भूमिकेसाठी त्या माणसाने पूर्ण नग्न असायला हवं प्रेक्षकासाठी या विचारांची मी आहे. तुमच्या भूमिकेला जर, कपडे काढणं त्या मोमेंटला गरजेचे असेल, तर त्या कलाकाराने ते केलंच पाहिजे.मग तो पुरुष असेल किंवा स्त्री.”
ती पुढे म्हणाली “पण जर तुम्ही विनाकारण मला हे करायला लावत असाल, तर मी तुमच्या दारातही परत येणार नाही. मला माझी उत्तर द्यावी लागतील. जर तुम्ही मला ते दिली तर मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय देईन.जर तुम्ही मला त्याचे उत्तर देऊ शकला नाही तर, मी तर लहान मुलांसारखी आहे, जी सारखी प्रश्न विचारत राहतात. हे असं का? तसं का? माझं शंका निरसन झालं नाही तर मी करणार नाही.गेले ते दिवस. जेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हा जर तुम्ही माझ्याकडे आला असतात तर मी कदाचित हो म्हणले असते. कारण सुरुवातीला ते असतं ना स्विमिंग पूलमध्ये उतरेन, अशी पोज देईन ..तेवढ्या वेळापुरतं ठीक आहे.आता हे सगळं मला एक्साइट करत नाही. असं ईशा केसकर म्हणाली.