Abhijeet Dipke On Sonam Wangchuk: चर्चा नाहीच, पण सोनम वांगचुकना दिल्ली पोलिसांनी बळजबरीनं उचलताच अभिजित दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, 20 जुलैचा मोर्चासुद्धा निघणार असल्याचा केला एल्गार


Abhijeet Dipke On Sonam Wangchuk: दिल्लीतील (Delhi) कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) आंदोलनात शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मोठा गोंधळ पाहायला मिळाला. NEET परीक्षेतील कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर इथे उपोषणाला बसलेल्या पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं. तिथून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर उपस्थित आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता सोनम वांगचुकना दिल्ली पोलिसांनी बळजबरीनं हटवल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. 

‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके म्हणाले की, “मी आजपासून माझं उपोषण सुरू करतोय. 20 जुलै रोजी आमचा मोर्चाही निघेल आणि माझे उपोषणही सुरूच राहील. सोनम सर यांना इथून उचलून नेल्यानं हे आंदोलन संपवता येईल, असं या लोकांना वाटतंय, पण हे आंदोलन संपणार नाही…” त्यासोबतच पुढे बोलताना अभिजीत दिपके यांनी आता धर्मेंद्र प्रधानांसह पंतप्रधान मोदींनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच, वांगचुकांना शिवीगाळ आणि आपल्याला मारहाण झाल्याचा आरोपही अभिजीत दिपके यांनी केलाय. 

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरुन हटवून रुग्णालयात दाखल केलं (Sonam Wangchuk)

दिल्ली पोलिसांनी शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हलवून रुग्णालयात दाखल केलंय. यानंतर, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांनी एक महत्त्वाचा दावा केलाय. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करुन सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी  मारहाण केली आणि त्यानंतर ताब्यात घेतलंय. गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी (18 जुलै) पहाटे आंदोलनस्थळावरून हलवले. त्यानंतर जंतरमंतरवरून CJP च्या कार्यकर्त्यांनाही हटवण्यात आलंय.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या कारवाईला तीव्र विरोध केलाय. आंदोलनस्थळी  आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय आणि या घटनेदरम्यान मोठी खळबळ उडाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, सोनम वांगचुक यांची ढासळती प्रकृती यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात नियोजित सुनावणी होणार असतानाच पोलीस कारवाई झाली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयानं त्यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि प्रशासनाला आवश्यक निर्देश देत, वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज वैद्यकीय तपासणी सुनिश्चित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

कोणत्याही नागरिकाचा जीव सर्वात महत्त्वाचा : उच्च न्यायालय 

उच्च न्यायालयानं सोनम वांगचुक यांच्याबाबत चिंता व्यक्त करत स्पष्ट केलेलं की, देशातील कोणत्याही नागरिकाचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवलं जावं आणि गरज भासल्यास आवश्यक वैद्यकीय उपाययोजना केल्या जाव्यात. वांगचुक यांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले होते.

“सोनम वांगचुक यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक…”

शुक्रवारी, सोनम वांगचुक यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आणि वैद्यकीय आणीबाणीची स्थिती असल्याचं सांगितलं. डॉक्टरांच्या मते, सलग 20 दिवस अन्नत्याग केल्यामुळे वांगचुक यांचे वजन 9 किलोपेक्षा जास्त घटलं होतं. त्यांच्या शरीरातील ग्लुकोज आणि फॅट्स पूर्णपणे संपल्यामुळे स्नायूंची झीज सुरू झाली होती. जर हे उपोषण त्वरित मागे घेतलं नाही, तर शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होऊ शकतात आणि त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

पाहा व्हिडीओ : Abhijeet Dipke On Sonam Wangchuk : अभिजीत दिपकेंनी केली पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी

महत्त्वाच्या इतर बातम्या :

देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *