Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा 21 वा दिवस, हृतिक रोशन म्हणतो, ‘मानसिक आघाताविषयी कळलं जेव्हा…’ – Marathi News | Bollywood actor Hrithik roshan On Sonam Wangchuk hunger strike


Hrithik On Sonam Wangchuk : शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून दिल्ली येतील जंतर – मंतर येथे आंदोलनाला बसले आहेत. आता त्यांच्या आंदोलनाचा 21 वा दिवस आहे. अनेक मागण्या घेऊन सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यामध्ये सर्वांत मोठी मागणी म्हणजे, NEET पेपर लीक प्रकरणात केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा… सांगायचं झालं तर, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या मुद्द्यावर आपला आवाज उठवत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत सर्वजण सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. आता अभिनेता हृतिक रोशन याने देखील पेपरफुटीच्या प्रकरणावर उघडपणे भाष्य केलं. त्याने NEET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक ‘स्टोरी’ शेअर केली आहे.

नुकताच हृतिक रोशन याने सोनम वांगचुक यांचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला. या व्हिडिओ क्लिपमध्ये, सोनम वांगचुक यांनी परीक्षांचे पेपर फुटण्याच्या मुद्द्यावर जनतेने बाळगलेल्या मौनाबद्दल प्रश्न उपस्थित केला. “तुम्ही कधी जागे होणार?” असा सवाल त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या गंभीर समस्येबाबत जागरूक राहण्याचं आणि पुढे येऊन आवाज उठवण्याचं आवाहन ते जनतेला करत आहेत. दरम्यान, हृतिक रोशननेही विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या मानसिक त्रासाबाबत भाष्य केलं.

काय म्हणाला हृतिक रोशन?

इन्स्टाग्राम स्टोरीवर सोनम वांगचुक यांचा एक व्हिडीओ शेअर करत हृतिक म्हणाला, ‘मला या मानसिक त्रासाबद्दल तेव्हा कळलं, जेव्हा एका सिनेमात मी स्वतः एका शिक्षकाची भूमिका साकारली.’, सध्या अभिनेत्यांची पोस्ट चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, हृतिक याच्या पूर्वी देखील अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन केलं. तर काही दिग्गद व्यक्तींनी आंदोलन स्थळी जात त्यांची भेट देखील घेतली.

शबाना आझमी, झीनत अमान आणि सोनी राजदान यांनी याप्रकरणी सरकारला संवाद साधण्याचं आवाहन केलं असून, सोनम वांगचुक यांनाही उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याबद्दल किरण राव हिने सोनम वांगचुक यांचे आभार मानले आहेत. तर, अभिनेता आमीर खान याने देखील वांगचुक यांच्या खालावणाऱ्या आरोग्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

हृतिक रोशन याची इन्स्टाग्राम स्टोरी…

सोनम वांगचुक यांच्यासाठी स्टोरी शेअर करताना अभिनेत्याने ज्या शिक्षकाचा उल्लेख केला आहे. त्या शिक्षकाची भूमिका अभिनेत्याने ‘सुपर 30’ सिनेमात साकारली आहे. ‘सुपर 30’ सिनेमा प्रसिद्ध शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्याभोवती फिरताना दिसत आहे. ज्यांनी गरीब मुलांकडून IIT परीक्षेसाठी तयारी करुन घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *