Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना जुलैच्या चौथ्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 20 to 26 July 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) : नात्याच्या बाबतीत तुम्ही तुमची बाजू स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. मात्र, जास्त कठोरपणे न वागता प्रेमाने संवाद साधा आणि आपली बाजू मांडा. तसेच, नात्यात तिसऱ्या व्यक्तीला मध्ये पडू देऊ नका. यामुळे नात्यात दुरावा देखील निर्माण होऊ शकतो. 

आर्थिक स्थिती (Wealth) : आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन आठवड्यात तुमचे छोटे-छोटे खर्च अचानक वाढताना दिसतील. यासाठी पैशांचा जपून वापर करा. अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

करिअर (Career) : करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे कराल. तुमच्या ध्येयावर तुमचा फोकस असणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना देखील सहकार्य करा. यामुळे तुमचीच प्रगती होईल. 

आरोग्य (Health) : मेष राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी दररोज किंमान 10 मिनिटं हलका वॉक किंवा स्ट्रेचिंग करावं. यामुळे तुम्हाला सतत ऊर्जावान वाटेल. तसेच, नवीन काहीतरी करण्याची इच्छा जागृत होईल. 

वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) : तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. मात्र, जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टींचा स्वीकार कराल. तसेच, नात्यात आपली बाजू स्पष्टपणे व्यक्त करणं गरजेचं आहे. जास्त भावनिक राहू नका. 

करिअर (Career) : करिअरच्या बाबतीत तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. यासाठी तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचं मत लक्षात घेणं गरजेचं आहे. 
नंतर निर्णय चुकण्याच्या आधी वेळीच त्यावर काम करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

आर्थिक स्थिती (Wealth) : या महिन्यात तुम्ही तुमचा पैसा योग्य तसेच, नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी अनावश्यक ऑनलाईन शॉपिंग करु नका. तसेच, कोणालाही पैसे उधार देऊ नका. यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं. 

आरोग्य (Health) : आरोग्याच्या बाबतीत नवीन आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल. मात्र, आरोग्याच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका. यामुळे तुमचंच नुकसान होईल. तसेच, मानसिक आणि शारीरिक शांतीसाठी नियमित योग आणि ध्यान करणं लाभदायी ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा गेमचेंजर; ‘या’ 5 राशींना लागणार जॅकपॉट, साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *