अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या – Marathi News | Jayant patil capable of handling finance ministry after ajit pawar says sushma andhare


गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलेली आहे. मात्र आता राष्ट्रवादीनेचे नेते अर्थखात्याची मागणी करत असल्याचे समोर आले आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते जयंत पाटील यांना अर्थखात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना अर्थमंत्रिपदावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जयंत पाटील अर्थखातं सांभाळण्यास सक्षम – अंधारे

सुषमा अंधारे यांना जयंत पाटील यांना अर्थखातं मिळणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अंधारे यांनी सांगितले की, ‘पक्ष कुठलाही असो, अजितदादांनी अर्थखातं उत्तम संभाळलं होतं. अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडे आहे. मात्र जयंत पाटील आमच्यासोबत आहेत. सुनील तटकरे, प्रफु्ल्ल पटेलांची विश्वासार्ता काय?दादा गेल्यावर बोलत होते विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नाही. आता बोलतात विलिनीकरणाबाबत चर्चा झाली, कोणते तटकरे खरे? तटकरे मुलांना मोठे करण्यात लागले होते, अनिकेत तटकरे, अदिती तटकरेंचा पोर्टफोलिओ काय? केवळ सुनील तटकरेंची मुलं, कर्तुत्व काय. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, भाजपच्या नेत्याला नव्हे. भेटीचं कारण जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

सनील तटकरेंच्या भूमिकेवर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, ‘सुनील तटकरेंना वाटलं सगळा पक्ष हातात घेता येईल, मात्र त्यांना ते जमलां नाही. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया समजण्याचा प्रयत्न तटकरेंनी केला, मी सहज लपेटू शकतो असं त्यांना वाटलं, पण तसं झालं नाही. मात्र घी सिधे उंगली से निकलत नव्हता म्हणून उंगली तेढी केली.’

शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार?

दरम्यान, काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होण्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतल्याचेही समोर आले होते. तसेच शरद पवारांच्या पक्षाचे अनेक आमदार NDA सोबत जाण्यास अनुकूल असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे आगामी काळात सकारात्मक घडामोडी घडल्या तर हे अर्थमंत्रिपद हे जयंत पाटलांकडे जाण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *