The Odyssey Movie Review: जेव्हा ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांचा एखादा सिनेमा प्रदर्शित होतो, तेव्हा त्याबद्दलची उत्सुकता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. ‘द ओडिसी’ (The Odyssey) बाबतही काही वेगळी परिस्थिती नाही. हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरू शकतो, अशी चर्चा आधीच सुरू झालीय. मुंबईत या सिनेमाचा एक विशेष प्रीमियर शो (Mumbai Special Premiere) आयोजित करण्यात आला होता, जिथे ‘एबीपी लाइव्ह’नं (ABP Live) हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देतो, विशेषतः आयमॅक्स (IMAX) मध्ये तो पाहणं हा एक अद्वितीय आनंद आहे. दरम्यान, भारतात आयमॅक्स स्क्रीन्सची संख्या मर्यादित असल्यानं, कदाचित तुम्हाला हा सिनेमा सामान्य स्क्रीनवर पहावा लागेल. तरीही, आमचा सल्ला हाच असेल की, किमान एकदा तरी हा सिनेमा आयमॅक्समध्ये पाहण्याचा अनुभव नक्की घ्यावा.
ख्रिस्तोफर नोलनच्या ‘द ओडीसी’ची कथा काय? (The Odyssey Directed By Christopher Nolan)
‘द ओडीसी’ सिनेमा इथाकाचा (Ithaca) ग्रीक राजा (Greek King Odysseus) ‘ओडिसियस’ आणि ट्रोजन युद्धानंतर (Trojan War) मायदेशी परतण्यासाठी त्यानं केलेल्या दहा वर्षांच्या प्रवासाची कथा सांगतो. यात त्याला भेटलेली माणसं, त्यानं अनुभवलेल्या घटना आणि मायदेशी असलेल्या त्याच्या कुटुंबाची बदलती परिस्थिती यांचं चित्रण ख्रिस्तोफर नोलान यांनी केलं आहे. अशी ही कथा आहे, जिचं खरं सौंदर्य केवळ थिएटर्समध्ये पाहिल्यावरच पूर्णपणे अनुभवता येतं.

ख्रिस्तोफर नोलनचा ‘द ओडीसी’ का पाहावा? (Christopher Nolan The Odyssey Movie)
ख्रिस्तोफर नोलनचा ‘द ओडीसी’ सिनेमाच्या कक्षा रुंदावणारा आहे. सिनेमाची किती प्रगती झाली आहे आणि एखादा चित्रपट प्रेक्षकांचा अनुभव कशा प्रकारे एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकतो, हे यात दिसून येतं. ख्रिस्तोफर नोलन यांनी काही सीन्स ज्या प्रकारे साकारले आहेत, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. त्यातून सिनेमाचं असं एक रूप समोर येतं ज्याची कदाचित तुम्ही कल्पनाही केली नसेल. याचं साउंड डिझाइन अप्रतिम आहे आणि हा सिनेमा तुम्हाला एका पूर्णपणे वेगळ्या विश्वात घेऊन जातो. तरीही, काही वेळा हा सिनेमा थोडासा लांब आणि रेंगाळल्यासारखा वाटू शकतो. आम्ही पाहिलेल्या स्पेशल स्क्रिनिंगला इंटरवल नव्हता, त्यामुळे जेव्हा सिनेमाचा काहीसा स्लो व्हायचा, तेव्हा काही लोक वॉशरुमसाठी किंवा खाण्यापिण्यासाठी बाहेर जाताना दिसत होते. यावरून हे स्पष्ट होतं की, काही प्रेक्षकांना हा सिनेमा काही टप्प्यांवर खूप मोठा किंवा लांब वाटू शकतो.
असं असलं तरी, जर तुम्ही ख्रिस्तोफर नोलन यांच्या कामाचे चाहते असाल, तर तुम्हाला यातील प्रत्येक सीन (फ्रेम) भव्य वाटू शकतो. अनेकजण सिनेमाला ‘मास्टरपीस’ मानू शकतात. मी कदाचित तितकं टोकाचं वक्तव्य करणार नाही. पण तरीही, हा निःसंशयपणे एक उल्लेखनीय सिनेमा आहे, यात शंका नाही.
‘द ओडीसी’ची दमदार स्टारकास्ट (The Odyssey Star Cast)
Matt Damon ने Odysseus च्या प्रत्येक पात्रात प्राण ओतलाय. त्याच्या अभिनयात वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतायत. एक राजा, एक पती, एक वडील आणि एक अशी व्यक्ती जी आपल्या कुटुंबाला पुन्हा भेटण्यासाठी फारच उत्सुक आहे, Matt Damon अभिनयाची ही प्रत्येक छटा त्यानं तितक्याच दमदार पद्धतीनं साकारली आहे. त्याला पडद्यावर वावरताना पाहून तुम्हाला विश्वास बसतो की, हाच तो King Odysseus आहे, Tom Holland चं कामंही जबरदस्त आहे. मोठ्या पडद्यावर तो एवढा प्रभावी वाटतोय की, तुम्हाला त्यानं साकारलेला स्पायडर मॅन (Spider-Man) विसरायला होतो. एका उत्तम अभिनेत्याची ओळख सांगायची तर, त्यानं प्रत्येक फिल्ममध्ये स्वतःला नव्या रुपात प्रेक्षकांसमोर सादर केलं पाहिजे. टॉम हॉलंड सिनेमात नेमकं हेच करतो. Anne Hathaway हिनं King Odysseus च्या पत्नीची म्हणजे, राणीची भूमिका खूपच सुंदर पद्धतीनं साकारलीय. तर, Robert Pattinson नं Antinous च्या भूमिकेत दमदार काम केलंय. Lupita Nyong’o डबल रोलमध्ये आहे आणि त्यानंही उत्तम काम केलंय.

‘द ओडीसी’ लेखन अन् दिग्दर्शन (The Odyssey Writing and Direction)
‘द ओडीसी’ सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन ख्रिस्तोफर नोलान यांनीच केलंय. नोलान नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो. आपल्या क्लासी आणि हटके शैलीतील सिनेमांसाठी तो ओळखला जातो. ख्रिस्तोफर नोलान सिनेमासाठी नेहमी असाच विषय निवडतो, ज्यावर सिनेमा तयार करण्याचा इतर कुणी साधा विचारही करणार नाही. नेहमीच तो आपल्याला भविष्यातल्या जगात घेऊन जातो. पण, यावेळी मात्र ख्रिस्तोफर त्याच्या प्रेक्षकांना हात धरून भूतकाळात घेऊन जातोय.
आधीच्या सिनेमांप्रमाणेच ख्रिस्तोफन नोलान यानं ‘द ओडीसी’ साकारून कमाल केलीय. त्यानं संपूर्ण फिल्म IMAX Cameras वर शूट केलीय आणि सिनेइंडस्ट्रीमधला हा आजवरचा सर्वात मोठा प्रयोग आहे. ‘द ओडीसी’चं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही दमदार आहेत.
एकंदरीतच ख्रिस्तोफर नोलानचा हा न भूतो न भविष्यती असा ‘द ओडीसी’ अजिबात चुकवू नका
रेटिंग : 4 स्टार्स