Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 19 जुलै रोजी लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यापूर्वी भारतीय क्रेकिट संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माचे (Rohit Sharma) आई-वडील, गुरुनाथ शर्मा आणि पौर्णिमा शर्मा, लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीचा शेवटचा ठरू शकतो. निवड समितीकडून भविष्यातील योजनांची माहिती मिळाल्यानंतर, रोहितने आपल्या आई-वडिलांना लॉर्ड्सवर उपस्थित राहता यावे आणि त्यांना आपला अखेरचा सामना पाहता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय निवड समितीने 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला असून, रोहित शर्मा भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचे त्याला कळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
🚨 NO ROHIT SHARMA FOR WORLD CUP. 🚨
– Lord’s could be Rohit’s final ODI as the selectors have conveyed him he’s not part of the 2027 World Cup plans. (Express Sports). pic.twitter.com/7Mg7Cki2TV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 16, 2026
निवड समितीची नजर आता 2027 च्या विश्वचषकावर- (ODI WC 2027)
वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीने गेल्या आठवड्यातच रोहित शर्माला भविष्यातील नियोजनाची (रोडमॅप) माहिती दिली. निवड समिती आता 2027 च्या वनडे विश्वचषकाचा विचार करून पुढे जात आहे आणि संघात युवा खेळाडूंना संधी देण्याची त्यांची योजना आहे. भविष्यातील वनडे संघात यशस्वी जैस्वालसारख्या युवा फलंदाजांवर महत्त्वाची आणि नियमित जबाबदारी सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे रोहित शर्माच्या संधींवर मर्यादा येऊ शकतात, असे मानले जात आहे.
इंग्लंड दौऱ्यावर रोहितची निराशाजनक कामगिरी- (Rohit Sharma Ind vs Eng)
सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्माची फलंदाजीतील कामगिरी चढ-उतारांची राहिली आहे. पहिल्या वनडेमध्ये त्याने केवळ ११ धावा केल्या, तर कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याला ४७ चेंडूंमध्ये केवळ २६ धावा करता आल्या. संपूर्ण मालिकेत रोहितला त्याची ओळख असलेली आक्रमक शैली दाखवता आली नाही आणि इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर धावा करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. दुसऱ्या वनडेतील अपयशानंतरच त्याच्या वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांना उधाण आले.
एका शानदार वनडे कारकिर्दीचा समारोप- (Rohit Sharma Retirement Marathi News)
लॉर्ड्सवरील वनडे सामना जर रोहित शर्माचा अखेरचा सामना ठरला, तर क्रिकेटच्या इतिहासातील एका अत्यंत शानदार वनडे कारकिर्दीचा समारोप होईल. रोहितने 286 वनडे सामन्यांमध्ये 48.67 च्या प्रभावी सरासरीने 11731 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 32 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा (264 धावा) विक्रम त्याच्या नावावर आहे. शिवाय, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आणि 2024 मध्ये टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. तसेच, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातम्या: