IND vs ENG: सामना गमावण्यामागे ‘तो’ एकटा जबाबदार, मॅचनंतर गिल प्रचंड भडकला, सरळ नाव घेतलं आणि झाप झाप झापलं – Marathi News | Shubman gill statement on team india loss 2nd odi match against england


इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला चार गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली असून, 19 जुलै रोजी होणारा तिसरा आणि अंतिम सामना करो की मरो परिस्थितीचा असणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ 233 धावांवर सर्वबाद झाला, जे लक्ष्य इंग्लंडने 45 व्या षटकात कडवी झुंज देऊन गाठले होते. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिल अत्यंत निराश दिसला. पराभवानंतर गिलने पराभवाची कारणांवरही भाष्य केले.

गिल म्हणाला, “खरं सांगायचं तर, हा निकाल खूप निराशाजनक आहे. 25 षटकांनंतर आम्ही खूप मजबूत स्थितीत होतो, पण त्यानंतर आम्ही नियमित अंतराने अनेक विकेट गमावल्या. आमचे खालच्या फळीतील खेळाडूही चांगली फलंदाजी करू शकतात हे आम्हाला माहीत असले तरी, आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पुढच्या वेळी, आम्ही छोट्या भागीदारी उभारण्यावर लक्ष केंद्रित करू.” खरं तर कालच्या सामन्यात इशान किशनला संधी मिळाली होती. के एल राहुलाला बाहेर बसवलं होतं, पण इशान विशेष काहीच करु शकला नाही. इशान एक धावा करुन बाद झाला. त्यामुळे कदाचित गिलचा रोख त्याच्याबाजूने असावा.

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीचे आणि विरोधी फलंदाज जो रूटचे कौतुक करताना गिल पुढे म्हणाले, “सुंदर आमच्या संघाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, पण फलंदाजी करताना तो जखमी झाला. मात्र, आमच्या मुख्य गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे मला वाटत नाही की त्यामुळे फार काही फरक पडला. हो, आम्ही सामन्याची लय नक्कीच गमावली. आणि जो रूटबद्दल बोलायचं झालं तर, तो अशा लक्ष्यांचा पाठलाग करण्यात खरा माहीर आहे.”

234 धावांचे सोपे वाटणारे लक्ष्य गाठताना इंग्लंडलाही भारतीय गोलंदाजांनी अडचणीत आणले. मात्र, अनुभवी फलंदाज जो रूटने एक बाजू सांभाळली. 133 चेंडूंमध्ये नऊ चौकारांसह 99 धावांची खेळी करून 45 व्या षटकात आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याला विल जॅक्स (30 धावा) आणि गस ऍटकिन्सन (23 धावा नाबाद) यांनी चांगली साथ दिली. भारताकडून गुरनूर ब्रारने दोन बळी घेतले, तर बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघ 44 षटकांत केवळ 233 धावांवर सर्वबाद झाला. विराट कोहली 65 धावा आणि उपकर्णधार श्रेय अय्यर 66 धावा यांनी शानदार अर्धशतके झळकावून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मात्र, जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजीसमोर (3/47) भारतीय मधली फळी पूर्णपणे कोसळली. भारताने अवघ्या 15 धावांत चार महत्त्वपूर्ण गडी गमावले, ज्यामुळे संघाला मोठी घावसंख्या गाठता आली नाही. रोहित शर्मालाही या सामन्यात संघर्ष करावा लागला आणि 26 धावा करुन बाद झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *