Pune Crime Khalil Shaikh: खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?


Pune Crime Khalil Shaikh: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख याने गुरुवारी लटेकडी भागातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्या करण्याआधी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात खलिल शेख याने (Khalil Shaikh) आत्महत्येपूर्वी लिहलेली एक चिठ्ठी (Suicide note) महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना या प्रकरणाचा उलगडा केला. (Pune Crime news)

खलील शेख हा लेबर कॉन्ट्र्रॅक्टर होता. त्याने ज्या इमारतीमध्ये आत्महत्या केली त्याच्या बाहेरच्या बाजूला चिठ्ठी चिटकवली होती. आणखी एक चिठ्ठी त्यांच्या खिशात होती. पोलिसांनी ही सदरची चिठ्ठी पाहिली आणि त्यानंतर खलील  शेखचा मृतदेह ससूनला पाठवण्यात आला. यानंतर काल संध्याकाळी खलील शेख याच्या पत्नीने केलेल्या तक्रारानुसार 14 जणांविरोधात फिर्याद नोंदवून घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली. 

खलील शेख 2011 पासून पुण्यात बांधकामाचे कामे करत होता. तो आरोपींकडे सेंट्रिगचं काम करत होता. खलील शेखने या कामासाठी बाहेरुन व्याजाने पैसे उचलेल होते. आम्ही व्याजासहित पैसे दऊ, असे आश्वासन असे या सगळ्यांनी दिले होते. मात्र, यापैकी कोणीही पैसे न दिल्याने खलील तणावात होता. उत्कर्ष असोसिएट ही जी फर्म आहे, त्याठिकाणी रवींद्र धंगेकर यांची पत्नी, बाळा शेडगे, रघू गौडा यांची पत्नी भागीदार आहेत. काल मृताची पत्नी सांगत होती, हे सगळे नावाला पार्टनर आहे, सगळा कारभार रवींद्र धंगेकर करतात. आता तपासात रोल काय होता, हे चेक करु.  कोणाचं किती येणं आणि देणं येतं, हे तपासले जाईल. रवींद्र धंगेकर एका व्यक्तीकडे पैशासाठी खेटे मारत होता, पण कोणीही त्याचे पैसे देत नव्हते. खलील शेख याच्या पत्नीने सर्वांविरोधात 14 जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. खलील शेख याने चिठ्ठीत अडीच कोटी रुपयांचे येणे बाकी असल्याचे म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर आहे. याप्रकरणात आम्ही योग्य ती कारवाई कर. आत्महत्या केलेल्या व्यक्तीने यापूर्वी कधीही पोलीस तक्रार केलेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात वेगळीच काही माहिती समोल येणार का, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय काय म्हणाले?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *