Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: 2 तासांचा जपानी व्हिडीओ, कॉन्ट्रॅक्ट; पहिले होकार, ऐनवेळी नकार; आता तोच सिया आणि चेतनविरोधातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार


Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agrawal Pune Lohagad Case) मुख्य संशयित सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. याप्रकरणी काल (16 जुलै) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

सदर प्रकरणात विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, पुन्हा एकदा केतन अग्रवाल प्रकरणातील संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. केतनची हत्या करण्यास सुरूवातीला दोघांनी कॉन्ट्रॅक्ट किलरला शोधले. या कॉन्ट्रॅक्ट किलरसोबत सिया आणि चेनतची एकदा भेटही झाली. यावेळी दोघांनी केतनची कॉन्ट्रॅक्ट किलरला माहिती दिली. परंतु केतन अग्रवालची माहिती जाणून घेताच या कॉन्ट्रॅक्ट किलरने नकार दिला. त्यामुळे होकार देणाऱ्या त्या कॉन्ट्रॅक्ट किलरनं ऐनवेळी माघार घेतली. आता तीच व्यक्ती सिया आणि चेतनविरोधात प्रमुख साक्षीदार ठरणार असल्याची शक्यता आहे. तसंच ज्या कॅफेमध्ये सिया आणि चेतननं या व्यक्तीसोबत मीटिंग केल्याचं समजतंय, त्या कॅफेचं सीसीटीव्ही जप्त करून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे. (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

पहिले सिया आणि चेतनला साथ दिली, आता त्याच्याविरोधातच सर्वात महत्त्वाचा साक्षीदार ठरला- (Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal)

सिया आणि चेतन यांचं लग्न ठरल्यानंतर दोघांनी केतनच्या हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली. केतनला सुरुवातीला ‘स्लो पॉइझन’ देऊन त्याचा खून करणे किंवा त्याला कायमचं अपंग करण्याचा कट सिया आणि चेतनने आखला होता. तसा प्रयत्नही करण्यात आला. मात्र विष मिळालं नाही, त्यामुळे तो डाव फसल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सिया आणि चेतनने केतनच्या हत्येसाठी सुपारी देण्याचाही प्रयत्न केला. या कामासाठी त्यांना एक व्यक्तीही मिळाला होता. सुरुवातीला त्या व्यक्तीने हत्या करण्यास होकार दिला. मात्र नंतर तो घाबरला आणि त्याने हे काम करण्यास नकार दिला. आता हाच व्यक्ती सिया आणि चेतनविरोधातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार ठरला आहे. पोलिसांनी त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेजही जप्त केलं आहे, जिथे सिया आणि चेतन यांनी कथित कॉन्ट्रॅक्ट किलरची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे.

सिया आणि चेतन यांनी तब्बल दोन तासांचा जपानी व्हिडीओ पाहिला- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

केतनचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याच ठिकाणी मार्च 2025 रोजी 21 वर्षीय विधी शाखेच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याची आत्महत्या म्हणून नोंद झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने ही बातमी वाचल्यानंतर चेतनसोबत मिळून केतनच्या हत्येचा कट आखला. केतनला ट्रेकिंगची आवड असल्याने त्याला लोहगडावर नेणं सोपं जाईल, याची सियाला कल्पना होती. त्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते आणि सामान्य दिवशी गर्दीही कमी असते. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळण्याची शक्यता अत्यंत कमी होती. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अटकेनंतर पोलिस चौकशीतून बचाव करण्यासाठी सिया आणि चेतन यांनी तब्बल दोन तासांचा जपानी व्हिडीओ पाहिल्याचं समोर आलं आहे. चौकशीदरम्यान शांत कसं राहायचं आणि प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, याबाबत या व्हिडीओमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं होतं. पोलिसांनी या दोन्ही व्हिडीओंच्या लिंकही सिया आणि चेतन यांच्या वेब हिसस्ट्रीमधून जप्त केल्याचा दावा केला आहे.

संबंधित बातमी:

Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: सिया बाहेर आली, पुढे तेच हॉटेल, त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; चेतनचे हॉटेलमधील कांड समोर, केतन अग्रवाल प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *