Twisha Sharma Insta Chat : हे लोक नीच… मी फसले यार, तू नकोस… ट्विशाचा अखेरचा मेसेज व्हायरल; संपूर्ण वेदनाच मांडली – Marathi News | Twisha Sharmas Tragic End: Don’t Marry, Last Chat Reveals Horrific Harassment


भोपाळमधील ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ट्विशाच्या मृत्यूपूर्वीचे दोन सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. आता ट्विशाचं शेवटचं इन्स्टाग्राम चॅट समोर आलं आहे. मृत्यूच्या काही दिवसाआधी तिने हे चॅट केल होतं. तिची मैत्रिण मीनाक्षी हिच्याशी तिने चॅटिंग केली होती. या चॅटमध्ये तिने मीनाक्षीला लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. यावरून ट्विशा लग्न करून किती पस्तावली होती हे स्पष्ट होतं.

आयुष्य संपवण्यापूर्वी ट्विशाने मीनाक्षी सोबत चॅट केली होती. यावेळी तिच्या संवादातून तिचं दु:ख दिसत होतं. मी फसले यार… तू फसू नकोस. जास्त काही बोलत नाही. पण योग्य वेळ आल्यावर तुला सर्व सांगेल, असं ट्विशाने इन्स्टाग्राम चॅटवर म्हटलं होतं. त्यावर मीनाक्षीने चिंता व्यक्त केली होती. मला तुझी काळजी वाटतेय. माझं तुझ्यावर निस्सिम प्रेम आहे, असं मीनाक्षीने उत्तरा दाखल म्हटलं होतं.

आईवडिलांना शेवटची विनवणी

वकील समर्थ सिंह यांच्याशी डिसेंबर 2025 मध्ये लग्न केल्यानंतर ट्विशा मानसिक आणि शारीरिक तणावातून जात होती, हे या चॅटवरून स्पष्ट दिसतं. यापूर्वी ट्विशाची व्हॉट्सअप चॅट समोर आली होती. मृत्यूच्या पाच दिवसापूर्वीच तिने आई आणि वडिलांना मेसेज केले होते. मी फार त्रस्त आहे. हे लोक अत्यंत वाह्यात आणि नीच आहेत. माझ्यावर संशय घेतात. माझ्या पोटात कुणाचं मूल आहे? असं समर्थ विचारत असतो. तुम्ही या आणि मला घेऊन जा. हे लोक मला जगू देणार नाहीत, असं ट्विशाने व्हॉट्सअप चॅटमध्ये म्हटलं होतं. या चॅटमधून तिने सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाची माहितीच दिली होती.

पाचच महिने झाले…

नोएडात राहणाऱ्या ट्विशा शर्माचं लग्न डिसेंबर 2025मध्ये निवृत्त जज गिरिबाला सिंह यांचा मुलगा समर्थ सिंह यांच्याशी झालं होतं. समर्थ पेशाने वकील आहे. दोघांची भेट मॅट्रोमोनियल साइट आणि डेटिंग अॅपवरून झाली होती. कुटुंबियांच्या मते, लग्नाच्या काही दिवसापर्यंत सर्व काही ठिक होतं. पण नंतर हळूहळू ट्विशाला मानसिक आणि शारीरिक त्रास सुरू झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर ट्विशाचा गर्भपात झाला होता. सासरच्या छळामुळे ट्विशाने 12 मे 2026 रोजी रात्री कटारा हिल्स येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ट्विशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. गळफास घेऊन ट्विशाचा मृत्यू झाला असला तरी तिच्या शरीरावर असंख्य जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे मृत्यूपूर्वी ट्विशा सोबत असं काय घडलं होतं? अशी चर्चा सुरू झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *