पुढे ती म्हणाली, “पण तुम्ही जर मला विनाकारण असं करायला लावणार असाल तर मी परत तुमच्या दारातही उभी राहणार नाही. म्हणजे मी एखाद्या लहान मुलांसारखी आहे, जे सतत प्रश्न विचारत असतात. हे असं का, ते तसं का, हे असं का केलं ते तसं का केलं. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. जर मला माझ्या प्रश्नाचं उत्तरं मिळालं, शंकाचे निरसन झालं, स्टोरीची गरज आहे हे मला समजलं तर मी करेन, अन्यथा मी करणार नाही.”