Last Updated:
धक्कादायक म्हणजे, पीडित महिला ही आदिवासी कुटुंबातील असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी पीडितेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आदिवासी संघटनेनं केला आहे.
जामनेर : जळगावमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील एका ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित ३० विवाहितेनं फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांविरोधात तक्रार दाखल केली. या पीडितेनं दिलेल्या तक्रारीमध्ये जेवणातून गुंगीचे औषध देऊन तसंच बंदुकीची भीती दाखवून अत्याचार केल्याचा आरोप देखील पीडित महिलेने तक्रारीत नमूद आहे.
एवढंच नाहीतर आरोपींनी अत्याचाराचा व्हिडिओही तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभरापासून वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप देखील पीडितेने तक्रारीत केला आहे.
अखेरीस, पीडितेनं हिंमत दाखवत फत्तेपूर पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. या या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, अपहरण, दुखापत, धमकी तसंच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती पलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी दिली. संतापजनक आणि धक्कादायक म्हणजे, मागील 20 दिवसातील जामनेर तालुक्यातील महिलेवर अत्याचाराची दुसरी घटना असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
धक्कादायक म्हणजे. पीडित महिला ही आदिवासी कुटुंबातील असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी पीडितेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आदिवासी संघटनेनं केला आहे. पीडित महिला ही रात्री पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आली होती, पण तिची तक्रार घेतली जात नव्हती. उलट तिच्या नवऱ्यालाच मारहाण करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतील. सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबद्दल जाब विचारला. पण, दुसऱ्या दिवशी म्हणजे, १६ जुलै रोजी सकाळपर्यंत तक्रार दाखल केली नाही. संतापजनक म्हणजे, तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांनी पूर्ण दिवस घालवला. कधी पीसी खराब असल्याचं सांगितलं तर कधी टायपिंग करण्यासाठी वेळ वाया घालवलं. एवढंच नाहीतर पीसीआयने पीडित महिला आणि तिच्या नवऱ्याला मारहाण केल्याचा आरोपही आदिवासी संघटनेनं केला आहे.
Jalgaon,Maharashtra
Jul 16, 2026 10:48 PM IST
Jalgaon: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून तक्रार घेण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप, जळगावमधील संतापजनक घटना
