Aamir Khan Third Marriage Controversy: ‘मी त्याला रडताना पाहिलंय…’; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य


Aamir Khan Third Marriage Controversy: सध्या बॉलिवूडचा (Bollywood News) ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ (Mr. Perfectionist) म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यासाठी कारण ठरतंय, त्याचं तिसरं लग्न. आमिर खाननं नुकतंच त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्यासोबत लग्न केलंय. साठीच्या आमिर खानचं (Aamir Khan Third Marriage) हे तिसरं लग्न आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, गौरीसोबतचं लग्न हे आमिर खानचं तिसरं लग्न असून यापूर्वी त्याची दोन लग्न होऊन घटस्फोट झालेत. तसेच, त्याला आधीच्या लग्नापासून तीन मुलं आहेत. त्यात गौरी स्प्रॅटचंही आमिरसोबत केलेलं लग्न दुसरं लग्न असून आधीच्या लग्नापासून तिला एक मुलगा आहे. अशातच आता आमिर खानच्या लग्नाला लव्ह जिहादचा रंग चढवला जातोय. तसेच, अनेकांनी त्याला ‘लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसिडर’, असंही संबोधलं आहे. अशातच आपल्या लग्नावरुन आमिर खान वादाच्या भोवऱ्यात अडकला असतानाच आता त्याची पाठराखण करायला त्याचा मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता पुढे सरसावला आहे. आमिर खान एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे, ज्यानं आयुष्यात अनेकदा प्रेमभंग अनुभवलाय. तसेच, प्रसिद्ध अभिनेत्यानं आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत. 

“आमिर खानला रडताना पाहिलंय…” (Amin Hajee On Aamir Khan)

‘रेडिफ’शी बोलताना प्रसिद्ध अभिनेता अमीन हाजी (Amin Hajee) आमिर खानबाबत बोलताना म्हणालाय की, “जर लोक आमिर खानला पुन्हा मिळालेल्या प्रेमाची खिल्ली उडवत असतील, तर या 61 वर्षांच्या अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत वेदना, अश्रू आणि कठीण प्रसंगांनी भरलेलं आहे, जे कित्येकांना दिसत नाही…”

‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत अमीन हाजी म्हणाला की, “इतक्या काळानंतर त्याला पुन्हा प्रेम मिळालंय आणि लोक विनोद करतायत, पण 15 वर्षे हा खूप मोठा काळ आहे. मी त्याचा खचलेलं पाहिलंय, मी त्याला रडताना पाहिलंय… बाहेरच्या लोकांना वाटतात तितके नातेसंबंध साधे-सोपे नसतात आणि एखादं लग्न मोडण्यासाठी केवळ एकच व्यक्ती जबाबदार असते, असं माननं चुकीचं आहे…”

“आमिर खान आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित…” (Aamir Khan Marriage Controversy)

अमीन हाजी आमिर खानबाबत बोलताना म्हणाला की, “खरं तर, आमीर आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित आहे. तो जे काही करतो, ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि जिद्दीनं करतो. अशा समर्पणाची एक किंमतही मोजावी लागते. जो व्यक्ती आपल्या कामात पूर्णपणे मग्न असतो, त्याच्यासोबत असताना समोरच्या व्यक्तीला कधीकधी दुर्लक्षित झाल्यासारखं वाटू शकतं…”

“त्यानं त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात…”

विवाहाबाबतचा आमिरचा दृष्टिकोन आणि त्याच्या घटस्फोटीत पत्नी, मुलांशी असलेले त्याचे संबंध यांवर बोलताना अमीन हाजी म्हणाला की, “अनेकदा नातं संपल्यानंतर लोकांच्या मनात कटुता निर्माण होते, पण आमिर खान तसा नाही. त्यानं नेहमीच विवाहसंस्थेचा आदर केलाय… आयुष्यात जेव्हा जेव्हा तो पुढे गेलाय, तेव्हा त्यानं ते जबाबदारीनंच सावरलंय. आपलं पूर्वीचं कुटुंब आणि मुलं यांची योग्य ती काळजी घेतली जाईल, याची त्यानं नेहमीच खबरदारी घेतलीय. फार कमी लोकांना ही गोष्ट समजते…”

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Khan Gauri Spratt Wedding: ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *