Sachin Ahir : उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेत आलेले सचिन अहिर नाखुश, एकनाथ शिंदेंच्या कानावर घातली नाराजी – Marathi News | Sachin Ahir who leave uddhav Thackeray and join Eknath shinde shivsena upset over not getting bunglow


दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडना घडली होती. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार आधी फुटले नंतर सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांचं सोडून जाणं हा उद्धव ठाकरे गटासाठी राजकीय धक्क्यापेक्षा व्यक्तीगत धक्का जास्त होता. कारण सचिन अहिर हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे खास होते. आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांचा सावलीसारखा वावर असायचा. आदित्य ठाकरे वरळीत आल्यानंतर सचिन अहिर नेहमी त्यांच्या शेजारी दिसायचे. अशा सचिन अहिर यांनी एकाएकी पक्ष सोडल्याने मोठा धक्का बसणं स्वाभाविक आहे. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यानंतर मोठा गाजावाजा करुन त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आमदारांमध्येही अस्वस्थतता असल्याच समोर आलं.

सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला खरा. पण ते समाधानी नाहीयत, नाखुश असल्याचं समोर आलं आहे. ते शिवसेनेवर नाराज नाहीत, तर उपसभापतीपदी निवड होऊनही बंगला न मिळाल्याने नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपल्याकडे संवैधानिक पद असूनही बंगला मिळत नाही अशी खंत त्यांनी खाजगीत बोलून दाखवली. याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे सचिन अहिर यांनी आपली नाराजी बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच बंगला मिळेल असं पक्ष नेतृत्वाने सचिन अहिर यांना आश्वासन दिलं आहे. उपसभापती पदाच्या आश्वासनावर सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

शरद पवारांना भेटून आशीर्वाद घेतले

सचिन अहिर मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांच्या राजकीय जडणघडणीत आणि करिअर घडवण्यात शरद पवार यांची महत्वाची भूमिका आहे. उपसभापती निवड झाल्यानंतर सचिन अहिर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. सचिन अहिर यांनी 2019 विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेने त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं. सचिन अहिर यांनी काही टर्म वरळी विधानसभेचं प्रतिनिधीत्व केलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *