पहिल्या प्रेमात जखम, दुसरं प्रेम शोधायचं! आदिनाथ कोठारेशी घटस्फोटानंतर उर्मिला कानेटकरचा ‘तो’ Video Viral | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Adinath Kothare Urmila Kanetkar Divorce : आता आदिनाथ कोठारेशी घटस्फोट घेणारी उर्मिला कोठारे काही वर्षे आधीच प्रेम, प्रेमात मिळणारी जखम आणि दुसऱ्या प्रेमाबाबत बोलली होती.

News18
News18

मराठी सेलिब्रिटी कपल्सपैकी एक म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. ज्यांनी घटस्फोट घेतला आहे. कित्येक महिने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होत होती. ज्याला ते अफवा म्हणत आले होते. पण अखेर त्यांनी आता आपण घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे. याचदरम्यान उर्मिलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात ती दुसऱ्या प्रेमाबाबत बोलली होती.

आदिनाथ-उर्मिलाने घटस्फोट जाहीर केल्यानंतर उर्मिलाचा प्रेमाबाबतचा तो जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आळा आहे. एका शोमध्ये उर्मिलाला प्रेमाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. प्रेम म्हणजे काय असं विचारताच उर्मिला म्हणाली, ‘प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास’

त्यानंतर पुढे तिला विचारण्यात आलं की, “जर त्याच प्रेमाने जखम दिली तर?” त्यावर काहीसा विचार करून ती म्हणते, “तर मग दुसरं प्रेम शोधायचं.” उर्मिलाने प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या’ या चॅट शोमध्ये हे वक्तव्य केलं होतं.

आता घटस्फोटानंतर उर्मिला काय करणार, ती दुसऱ्या प्रेमाचा किंवा दुसऱ्या लग्नाचा विचार करणार का? याकडे सगळ्याचंं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

पहिल्या प्रेमात जखम, दुसरं प्रेम शोधायचं! आदिनाथ कोठारेशी घटस्फोटानंतर उर्मिला कानेटकरचा ‘तो’ Video Viral



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *