धावत्या लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार; दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी, दोघांची प्रकृती गंभीर – Marathi News | Mumbai local train crime news csmt ambernath three men attack to passenger with sickle over seat dispute


मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस हाणामारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये जोरदार हाणामारीची घटना घडल्याचे समोर आलं आहे. या हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलमधील हाणामारीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर-अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर झोपलेल्या प्रवाशाला उठवल्याने वादाला सुरुवात झाली. लोकलमधील या वादामुळे दोन गट आमनेसामने आले. डोंबिवली स्थानकानंतर धावत्या लोकलमध्येच दोन्ही गटाची तुफान हाणामारी झाली. एकाने लोखंडी कड्याने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत प्रितेश कनोजिया आणि राजू वाघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले. कल्याण रेल्वे पोलिसांकडून दोन्ही जखमींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शा‍ब्दिक वादानंतर जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून दोन गट भिडले. अंबरनाथ लोकलच्या लगेज डब्यात मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. शा‍ब्दिक वादानंतर हाणामारी झाल्याने एकाच्या लोखंडी कड्याच्या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. राजू वाघे (19), साहिल खंदारे (19) आणि प्रितेश कनोजिया (31) असे जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना प्रथम रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवले.

धावत्या लोकल ट्रेनमध्ये फिल्मी स्टाइल हाणामारी

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा फिल्मी स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये काही प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसताहेत. त्यातील एका व्यक्तीकडून ‘मशीन काढ’ अशी धमकीवजा हाकही ऐकू येत आहे, असा दावा केला जात आहे. लोकल ट्रेनमधील हा वाद नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. लोकलमध्ये हाणामारीच्या वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याचे या नव्या व्हिडिओमुळे पुन्हा समोर आले आहे. या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *