Labh Drishti Yog 2026 : शनि-मंगळ ग्रहाचा लाभ दृष्टी योग लवकरच…19 जुलैपासून ‘या’ राशींकडे चुंबकासारखा येणार पैसाच पैसा


Labh Drishti Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 19 जुलै 2026 रोजीच्या रात्री 11 वाजता मंगळ आणि शनि ग्रहाच्या दरम्यान 60 डिग्रीचा लाभ दृष्टी योग जुळून येणार आहे. ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला ऊर्जा, साहस आणि नेतृत्वाचा कारक ग्रह मानला जातो. तर, शनिला शिस्त, धैर्य आणि कर्माचा कारक ग्रह मानतात. या दोन्ही ग्रहांच्या दरम्यान बनणारा योग हा दृष्टी योग आहे. हा योग सकारात्मक आणि ऊर्जा देणारा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, हा योग सर्वात अधिक शुभ प्रभावी आहे. याचा मेष, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशींवर शुभ परिणाम होणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा योग नवीन आशा घेऊन येणारा असणार आहे. या काळात तुमची अनेक काळापासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमच्या कामाला गती मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक भरभराटीचा असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. मानसिक तणाव जाणवणार नाही. तसेच, तुमची निर्णय घेण्याची क्षमता अधिक चांगली होईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढण्यास मदत होईल. मित्रांचा सहयोग तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी हा योग विशेष करुन करिअर आणि व्यवसायासाठी फार अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना नवीन डील मिळू शकते. मोठ्या ग्राहकांपासून चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली स्थिरता आलेली दिसेल. भविष्यासाठी तुम्ही नवीन योजना आखाल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळ-शनिचा हा लाभ दृष्टी योग कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम घडवून आणणारा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच, सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Numerology : मॅन्युपुलेटिव्ह आणि स्मार्ट असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक; समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लॅग्वेजवरुनच ओळखतात मनातलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *