Lionel Messi Viral Video: अटलांटात अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेलेला फिफा विश्वचषक 2026 चा उपांत्य फेरीचा सामना जरी रोमांचक ठरला असला तरी, मैदानावर लिओनेल मेस्सी आणि ज्युड बेलिंगहॅम यांच्यातील शाब्दिक चकमकीने सुद्धा गाजला. सामन्यादरम्यान या दोन खेळाडूंमधील शाब्दिक चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तथापि, हा सामना अर्जेंटिनाच्या जबरदस्त पुनरागमनाने आणि इंग्लंडच्या निराशाजनक पराभवाने संपला. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, ज्युड बेलिंगहॅम लिओनेल मेस्सीसोबत वाद घालताना दिसत आहे. संभाषण संपल्यानंतर, बेलिंगहॅम हलकेसे हसून निघून गेला. दुसरीकडे, मेस्सी शांत दिसत होता आणि त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. त्यानंतर अर्जेंटिनाने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यात मेस्सीने दोन्ही गोलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.
नाद करा, पण मेस्सीचा कुठं!
अर्जेंटिनाच्या विजयानंतर, या घटनेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. अनेक चाहत्यांनी बेलिंगहॅमवर निशाणा साधत लिहिले की, मेस्सीला चिथावणी देणे कोणालाच सोपं नाही. व्हायरल व्हिडिओवर असंख्य प्रतिक्रिया आल्या. उपांत्य फेरीचा सामना संपल्यानंतरही बेलिंगहॅम चर्चेत राहिला. अंतिम शिट्टी वाजताच, त्याचा अर्जेंटिनाचा खेळाडू व्हॅलेंटिन बार्को आणि इतर अनेक खेळाडूंशी जोरदार वाद झाला. मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.
Never woke up a lion. NEVER!
What do you think Bellingham said to Messi to get that reaction? pic.twitter.com/CHpovo6rRg
— Patrick Bet-David (@patrickbetdavid) July 16, 2026
युवराजशी झालेल्या वादाची आठवण
दुसरीकडे, असाच प्रकार 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा घडला होता. मैदानात तुफानी फटकेबाजी सुरु असताना युवराज सिंगला इंग्लंडच्या अँड्यू फ्लिंटाॅफने डिवचण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. यानंतर संतापलेल्या युवराजने सगळा राग सहा चेंडूत सहा षटकार ठोकत विश्वविक्रम केला होता. यानंतर फ्लिंटाॅफचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. मात्र, त्याचा बळी स्टुअर्ट ब्राॅड ठरला होता. त्यामुळे डिवचण्याचा उद्योग इंग्रजांच्या चांगलाच अंगलट आला आहे.
Yuvraj singh…..
6 six in over(six boles)@YUVSTRONG12 #YuvrajSingh pic.twitter.com/X6IuQWbk2e— YUVRAJ_LIGREE (पायलट समर्थक) (@LIGREEYUVRAJ) March 2, 2024
मेस्सीसोबत काय झाले? बेलिंगहॅमने स्वतःच खुलासा केला
दुसरीकडे, सामन्यानंतर, ज्युड बेलिंगहॅमने या संपूर्ण घटनेवर मौन सोडले. त्याने सांगितले की, मेस्सीसोबतचे त्याचे संभाषण केवळ एका फाऊलबद्दल होते आणि त्यात कोणताही वैयक्तिक राग नव्हता. बेलिंगहॅम म्हणाला की, ते दोघे पूर्वी झालेल्या एका फाऊलवर चर्चा करत होते. त्याने मेस्सीला सांगितले की, तो असा टॅकल सहन करण्याइतका मजबूत खेळाडू आहे. मेस्सीने यापूर्वी त्याच्यावर झालेल्या एका फाऊलचा उल्लेख केला होता. बेलिंगहॅमने स्पष्ट केले की, या संभाषणाला अवाजवी महत्त्व दिले जात आहे, कारण मैदानावर काहीही गंभीर घडले नव्हते.
बेलिंगहॅम मेस्सीबद्दल काय म्हणाला?
इंग्लंडच्या पराभवाने निराश झालेल्या बेलिंगहॅमने मेस्सीची प्रशंसाही केली. तो म्हणाला की लिओनेल मेस्सीसारख्या महान खेळाडूविरुद्ध खेळणे हा एक सन्मान होता. त्याने पुन्हा एकदा सांगितले की मेस्सीबद्दल त्याच्या मनात कोणताही द्वेष नाही. पराभव निश्चितच वेदनादायी असतो, पण जगातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेस्सीविरुद्ध खेळणे नेहमीच खास राहील. आता अर्जेंटिनाचा सामना अंतिम फेरीत स्पेनशी होईल, तर इंग्लंडचा सामना 18 जुलै रोजी तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात फ्रान्सशी होईल.
इतर महत्वाच्या बातम्या