Surya Gochar 2026 : आजची रात्र महत्त्वाची…! सूर्याचा कर्क राशीत होणार प्रवेश, 3 राशींचा शुभ काळ सुरु, पुढचे 30 दिवस जगाल राजासारखं जीवन


Surya Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याचं (Surya Gochar) संक्रमण आज म्हणजेच 16 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजून 44 मिनिटांनी होणार आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. सूर्य चंद्राच्या ठिकाणी एक महिनाभर असणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी सूर्याचं संक्रमण सिंह राशीत होणार आहे. कर्क राशीत सूर्याच्या होणाऱ्या संक्रमणामुळे 3 राशींच्या लोकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

सूर्याचं संक्रमण कर्क राशीत झाल्याने या राशीच्या लोकांना शुभ प्रभाव मिळणार आहे. या काळात सूर्यदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या सामाजिक पद-प्रतिष्ठे चांगली वाढ झालेली दिसेल. या काळात तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला तुमची अनेक कामे पूर्ण करता येतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. तर, कर्क राशीत सूर्याचं संक्रमण तुमच्या करिअरला नवी दिशा देणारं ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्यामुळे तुमचा प्रभाव अधिक वाढेल. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली वाढ होईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. अनेक नवीन गोष्टी तुम्ही या काळात शिकून घ्याल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

सूर्याचं संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नशीब पालटणारं ठरणार आहे. या 30 दिवसांच्या कालावधीत तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता . तसेच, कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील. प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासमोर मोकळे होतील. तसेच, एखादी चांगली डील तुमच्या हाती लागू शकते. तसेच, या कालावधीत तुम्हाला परदेशातही जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                   

Labh Drishti Yog 2026 : शनि-मंगळ ग्रहाचा लाभ दृष्टी योग लवकरच…19 जुलैपासून ‘या’ राशींकडे चुंबकासारखा येणार पैसाच पैसा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *